भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
दिनांक 31/10/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे पथक पेट्रोलिंग करत पोस्टे तुळजापूर हद्दीत असताना गुप्त बातमीवरून बातमीवरून पोलीस तुळजापूर गु.र.नं.406/2025 क.304,3 (5)BNS गुन्ह्यातील गेला माल व आरोपीचा शोध घेणे कामी सदर ठिकाणी रवाना होवून तुळजापूर येथुन आरोपी नामे-मनोज उर्फ पापा महादेव धोत्रे वय 30वर्ष रा वेताळ नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यास ताब्यात घेऊन त्याचे कडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा मी माझा साथीदार यांनी मिळून केल्याचे सांगितले. त्यावर पथकाने नमुद आरेापीच्या ताब्यातुन गुन्ह्यातील मुद्देमाल (एक रेडमी कंपनीचा मोबाईल) हस्तगत करून नमुद आरोपी पुढील तपास कामी पोलीस ठाणे तुळजापूर येथे रिपोर्ट सह हजर केले
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोह- राहुल नाईकवाडी, समाधान वाघमारे, बळीराम शिंदे, अशोक ढगारे, चालक विनायक दहिहांडे, योगेश कोळी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोअं सुर्यवंशी, भोसले यांच्या पथकाने केली आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












