• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

खोटं बोलणाऱ्या सरकारवर हक्कभंगाची कारवाई करावी खासदार ओमराजे यांनी शेतकरी मदतीसाठी संसदेचे वेधले लक्ष्य

lokmadat news by lokmadat news
December 4, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
21
VIEWS

खोटं बोलणाऱ्या सरकारवर हक्कभंगाची कारवाई करावी खासदार ओमराजे यांनी शेतकरी मदतीसाठी संसदेचे वेधले लक्ष्य

            धाराशिव ता.4: एका बाजूला राज्य सरकार म्हणतंय आम्ही मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारचे जबाबदार मंत्री  राज्या कडून असा प्रस्ताव आला नसल्याच सांगत आहेत. मग लोकप्रतिनिधीनी विचारलेल्या प्रश्नांना खोटी उत्तर देत असतील तर यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी अशीच मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेच्या अधिवेशनात केली आहे.

खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मदत मिळण्याऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा धक्कादायक खुलासा लोकसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नांमधून समोर आल्याचे खासदार राजेनिंबाळकर यांनी सांगितले. एका बाजूला राज्य सरकारने अकाड्याचा खेळ केला शेतकऱ्यांना पदरात काहीच पडलं नाही. राज्य सरकार वरील विश्वास उडाल्याने आता केंद्राची अपेक्षा होती.शेतकरी अडचणीत असताना मदतीची अपेक्षा केंद्र सरकारकडून होती. मात्र आश्वासने देऊन त्यांनी तर वेळकाढूपणाची पद्धत सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या संकटाची त्यांनी थट्टा केली आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील, विशेषतः धाराशिवमधील अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि केंद्रीय मदतीबाबत लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी धक्कादायक माहिती दिली. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात २६ नोव्हेंबरपर्यंत तब्बल ७५.४२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे, तर २२४ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.केंद्राने नुकसानीची पाहणी करण्यासाठी ३ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या काळात केंद्रीय पथक  महाराष्ट्रात पाठवले होते. मात्र, पाहणी होऊन महिना उलटला तरीही, “महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला मदतीसाठी कोणतेही औपचारिक निवेदन प्राप्त झालेले नाही,” असा दावा केंद्रीय मंत्र्यांनी लेखी उत्तरात केला आहे.

सरकारने तात्काळ निर्णय घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व पुरेशी मदत दिली पाहिजे,अशी अपेक्षा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

Tags: dharashivosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलउपमुख्यमंत्री अजित पवारउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
SendShareTweet
Previous Post

धाराशिव आगारातील आगार व्यवस्थापकाचा प्रवाशाच्या जीवाशी खेळ

Next Post

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या निर्देशाने तत्काळ उपाययोजना…धाराशिव बसस्थानकात प्रवाशांसाठी आरओ पाण्याची सुविधा

Related Posts

महाराष्ट्र

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026
महाराष्ट्र

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026
महाराष्ट्र

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026
महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
Next Post

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या निर्देशाने तत्काळ उपाययोजना...धाराशिव बसस्थानकात प्रवाशांसाठी आरओ पाण्याची सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT