• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

सांजा रोड येथील रामेश्वर मोहिते खून प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

lokmadat news by lokmadat news
November 29, 2025
in क्राईम
0
0
SHARES
1k
VIEWS

सांजा रोड येथील रामेश्वर मोहिते खून प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) – तालुक्यातील सांजा येथील रामेश्वर मोहिते यांचा धाराशिव शहरातील सांजा रोडवरील भवानी चौकात भर दुपारी दुचाकी बुलेट अंगावर घालून खाली पाडून धारदार शस्त्रांनी वार करुन दोन्ही हात व पाय शरीरा वेगळे करुन खून केला. या प्रकरणी न्यायालयामध्ये आरोपींचे वकील
ॲड.अमोल वरुडकर यांनी केलेला युक्तिवाद व साक्षीदार यांचा जबाब यात आलेल्या विसंगती तसेच कायद्याच्या तरतुदी या सर्व बाबी आरोपींच्या वकिलांनी भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडल्यामुळे यातील सर्व आरोपींची मे.न्यायालयाने निर्दोष मुक्तता दि.२९ नोव्हेंबर रोजी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २६ एप्रिल २०२३ रोजी सांजा येथील रामेश्वर किसन मोहिते हे धाराशिव शहरातील सांजा रोडवरील भवानी चौकात रोडवर उभे होते. त्यावेळी आरोपी रणजीत सुभाष सुर्यवंशी, सागर रहमरी पडवळ, अक्षय रामहरी पडवळ, नारायण नागनाथ डोंगरे व चिवळादादा सुर्यवंशी यांनी मिळून रामेश्वर मोहिते यांच्या अंगावर दुचाकी बुलेट घालून त्यास खाली पाडले. तर रणजीत सुर्यवंशी व सागर रामहरी पडवळ यांनी रामेश्वर मोहितेच्या अंगावर कत्तीने हातावर व दोन्ही पायावर वार करून दोन्ही पाय व हात शरीरापासून वेगळे करून त्याचा खून केला. विशेष म्हणजे रामेश्वर मोहिते यास एक तासभर कोणीचीही मदत मिळू दिली नाही किंवा त्याच्या जवळ कोणालाही जाऊ दिले नाही. या प्रकरणी रामहरीचा भाऊ पांडूरंग मोहिते यांनी वरील पाच आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वरील आरोपी विरुद्ध कलम ३०२, १४९, १४७, १४८ अन्वये पाच जनाविरुद्ध आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदकरण्यात आला. सदर गुन्ह्यावरून आनंदनगर पोलिसांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप पाटेकर यांनी तपास करुन पाच आरोपींना अटक करून त्या आरोपी विरोधात न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यात सुरुवातीपासून ॲड. अमोल वरुडकर यांनी काम पाहून यातील आरोपी अक्षय रामरी पडवळ, नारायण नागनाथ डोंगरे आणि काका चिवळादादा सुर्यवंशी यांना या गुन्ह्यातून अगोदरच बाहेर काढले होते. त्यानंतर रणजीत सुभाष सुर्यवंशी व सागर रामहरी पडवळ यांच्या विरोधात दोषारोपत्र दाखल झाले होते. सदर गुन्ह्याचे दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर मे.न्यायालयात सुनावणी सुरू होऊन एकूण १३ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. यात कोणताही साक्षीदार व फिर्यादी देखील फितूर झालेले नव्हते. परंतू, आरोपीच्या वकिल ॲड.अमोल वरुडकर यांनी केलेला युक्तिवाद व साक्षीदार यांचा जबाब यामध्ये आलेल्या विसंगती आणि कायद्याच्या तरतुदी या सर्व बाबी आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडल्यामुळे यातील आरोपी रणजीत सुभाष सूर्यवंशी व सागर रामवाडी पडवळ यांची मे.न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यातील आरोपी सागर रामहरी पडवळ व रणजीत सुभाष सुर्यवंशी हे अडीच वर्षांपासून धाराशिव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात होते. या प्रकरणात सुरुवातीपासून ॲड.अमोल वरुडकर यांनी काम पाहिले होते. त्यानंतर आरोपी रंजीत सुभाष सुर्यवंशी यांच्यातर्फे ॲड. व्ही.पी. डोके यांनी व आरोपी सागर रामहरी पडवळ यांच्या तर्फे ॲड.अमोल वरुडकर यांनी काम पाहिले होते. त्यांना ॲड वैभव खांडेकर ॲड.किरण चादरे, ॲड.सचिन जाधव, ॲड.बालाजी पोतदार, ॲड.रजनीकांत ढेकणे, ॲड.जनक साळुंखे व ॲड.दीपक तुपसुंदरे यांनी काम पाहिले.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत मूल्यमापन समितीच्यावतीने धाराशिव बस स्थानकाची पाहणी

Next Post

धाराशिवमध्ये परिवर्तनाची नवी लाट; राष्ट्रवादीची तुतारी घुमण्यास सज्ज!

Related Posts

क्राईम

नियमभंग, गुन्हे आणि तक्रारींचा पाढा ‘महाकाली’ कला केंद्र ला सीलचा दणका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

February 26, 2026
क्राईम

धाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

February 25, 2026
क्राईम

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

February 15, 2026
क्राईम

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

February 12, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त …धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
Next Post

धाराशिवमध्ये परिवर्तनाची नवी लाट; राष्ट्रवादीची तुतारी घुमण्यास सज्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT