धाराशिवमध्ये बेलगाम कर्मचाऱ्याचा कथित ‘कॅमेरा सापळा’!
अवैध दारू की अवैध आर्थिक सौदा? पिशवीतली कहाणी चर्चेत
धाराशिव, दि. 23 नोव्हेंबर (प्रतिनिधी) :धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून सोलापूर मार्गावर ताजमहाल टॉकीजजवळ रविवारी दुपारी कथितरीत्या घडलेल्या घटनेने पोलिस दलातील चर्चेला ऊत आला आहे. आठवडी बाजाराजवळून जात असलेल्या एका ऑटो रिक्षामधून काही बॉक्स नेले जात असल्याची माहिती मिळाल्याचा दावा करत बराच अनुभव असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या “बेळ”गाम झालेल्या एका कर्मचाऱ्याने सोबत दुसऱ्या कर्मचाऱ्याला घेऊन सिटी हॉटेलसमोर सदर रिक्षा अडवल्याची चर्चा रंगली आहे.
रिक्षा अडवल्यानंतर रविवारी आठवी बाजार व गर्दी आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण असतानाही कथितरीत्या काही आर्थिक मागणी झाल्याची चर्चा विविध ठिकाणी चवीने केली जात आहे. याबाबत असा ही आरोप आहे की संबंधित रिक्षाचालकाने काही रकमेला मान्यता दिल्यानंतर ती रक्कम थेट न स्वीकारता जवळच असलेल्या केळीच्या गाड्यावर कॅरीबॅग पिशवीच्या खाली ठेवण्यास सांगण्यात आल्याचे (व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे) दावा केला जात आहे.
अर्थात, या कथित व्यवहारात स्वयं कर्मचारी थेट पैसे न स्वीकारता ‘झिरो कर्मचारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ती रक्कम घेतल्याचे सांगितले (व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे) जात आहे. सोशल मीडियाच्या युगात या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ रिक्षातील प्रवाशाने चित्रीत केल्याची चर्चा आता पोलिस स्टेशनपासून शहरातील चहावाल्यांच्या दुकानात पोहचली आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ कोणाच्या ताब्यात आहे? त्यातील मजकूर नेमका काय? आरोप, अफवा की वास्तव? याबाबत मात्र अधिकृतरीत्या कोणताही पुरावा समोर आला नसून केवळ चर्चांच्या आधारावरच आरोपांची रांग सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील काही कर्मचारीच सावधपणे “बरं झालं मी त्या दिवशी तिथे नव्हतो”, “याची परतफेड होणारच होती” असे बोलत असल्याचेही दिसून येत आहे.
सध्या या घटनेबाबत कुठलीही अधिकृत नोंद अथवा कारवाई झाल्याची माहिती उपलब्ध नसून, संबंधित आरोप, चर्चा आणि व्हिडिओबाबत ठोस पुरावा न मिळाल्याने संपूर्ण प्रकरण धूसर राहिले आहे. मात्र ‘तिसऱ्या डोळ्यापासून’ बचाव करण्यासाठी सावधानतेची गरज असल्याची चर्चा मात्र अधिक वेगाने होत असल्याचे जाणवत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786














