• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

अमरावतीचे आ. प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा…

lokmadat news by lokmadat news
October 14, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
9
VIEWS


अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.१३ रोजी अमरावती येथून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या ‘पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप’तर्फे अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या 3 ट्रक्सला झेंडा दाखवून रवाना केले होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ.प्रवीण पोटे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. अतिवृष्टीग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन आलेल्या त्या 3 ट्रक्सचे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होताच भाजपाकडून स्वागत करण्यात आले. या वस्तूंमध्ये दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंचाही समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेसमोर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मदतीचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत भाजपा नेते माजी मंत्री तथा अमरावतीचे आमदार प्रविण पोटे पाटील आणि त्यांचे सुपुत्र श्रेयशदादा पोटे यांनी महत्त्वपूर्ण सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या ‘पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप’तर्फे मदतीचा मोठा हात पुढे करत अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यासाठी ३ ट्रक भरलेले अन्नधान्य, कपडे आणि घरगुती आवश्यक साधनसामग्री पाठवले आहे. सदरील साधन सामुग्री जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत थेट गरजूंना वितरित करण्यात येणार आहे.. या ट्रक्सचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होताच प्रमुख अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. 

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ‘पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप’ आणि माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी समाजाप्रती दाखवलेली सामाजिक बांधिलकी अत्यंत स्तुत्य आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारे प्रविण पोटे पाटील आणि त्यांचे सुपुत्र श्रेयशदादा पोटे हे अनेक वर्षापासून महाराष्ट्रात किंवा देशावर नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर तत्परतेने एक हात मदतीचा नेहमीच पुढे करतात…यापूर्वीही प्रवीण पोटे पाटील यांनी ₹२५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सुपूर्त करून आपली संवेदनशीलता सिद्ध केली आहे, असे सांगत भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आ.प्रविण पोटे यांचे कौतुक करत आभार मानले.

यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, माजी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, मकरंद पाटील, दत्ता देवळकर  निहाल काझी, प्रीती कदम, अरुण चौधरी, साहेबराव घुगे, पांडुरंग पवार, नाना कदम, अनिल भुतेकर, रंजना राठोड, प्रणव चव्हाण, प्रदीप शिंदे, दिनेश देशमुख, भिवाजी इंगोले, विलास राठोड, सागर दंडनाईक, निलेश शिंदे, मनोज रणखांब, प्रशांत रणदिवे, विद्या माने, रोहित देशमुख, नामदेव नायकल, गणेश एडके, अमोल पाटील, विशाल पाटील, सुरेश फेरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

कर्तव्यात कसूर, अहवाल सादर – निलंबित पोलिस निरीक्षक शेळके यांच्या अडचणीत वाढ – पोलिस अधीक्षक रितु खोखर

Next Post

एम आर आय मशीन सुरु करण्यास परवानगीच मिळेना !तज्ञांच्या टीमचा तपासणी करण्यास टाळाटाळ का ?रुग्णांची परवड अन् नेतेगिरी श्रेयवादात गुरफटली !

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

एम आर आय मशीन सुरु करण्यास परवानगीच मिळेना !तज्ञांच्या टीमचा तपासणी करण्यास टाळाटाळ का ?रुग्णांची परवड अन् नेतेगिरी श्रेयवादात गुरफटली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT