त्या कानफुक्या आणि रील्स स्टारचा आणखी फुशारकीचा कारनामा आला समोर ! न.प.च्या अधिकाऱ्यांवरच दाखवला ‘फुसका रुबाब’!..
धाराशिव लोकमदत न्यूज
जिथे जाईल तिथे उठ सूट फुशारकीचे कारनामे करण्याची जडलेली फुकटची हौस आणि बेइज्जत होऊन त्यातच मश्गूलपणे मिरवायचे. त्यामुळेच तर कानफुक्या रील स्टार म्हणून नावारूपाला आलेल्या व लौकिक मिळविलेल्या धाराशिव नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या एका हौश्या, नौशा आणि गवश्या सभा………ने पुन्हा नवा कारनामा केला आहे. तो कारनामा सगळीकडे इतक्या चवीने चर्चिला जाऊ लागला आहे की, त्या कारनाम्यावर पुन्हा रील्स का केली नाही ? असे अनेकजण म्हणू लागले आहेत. विशेष म्हणजे कोठे आणि कसे बोलावे ? काय करावे ? याचे भान तर अजिबातच राहिलेले नाही. मीच खरा लोकप्रतिनिधी असल्याच्या तोऱ्यात वावरत आपण स्वच्छ विभागाचे की अस्वच्छ विभागाचे सभापती म्हणून काम करतो ? हेच मुळी समजत आणि उमगत नाही. तरी देखील या कानफुक्या रील्स स्टारला मंत्र्याच्यावरचा घमेंड आणि फुगीरपणा ठासून भरलेला असल्याचे एका घटनेवरून दिसून येत आहे.
त्याचे झाले असे की, मागील आठवड्यात धाराशिव नगर परिषदेत कानफुक्या, रील स्टार आपल्या अस्वच्छ विभागाचा स्वच्छ कारभार करण्याऐवजी दुसऱ्याच्या ताटात काय ठेवलेले आहे ? हे पाहण्याची आणि उचापती करण्याची लय बेकार सवय लागलेली आहे. विशेष म्हणजे शहरातील स्वच्छता करण्याला प्राधान्य तर दिले जात नाहीच. कदाचित त्याला त्या विभागाच्या खात्यामध्ये रसच वाटत नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता व गटारी तुंबल्याने काही प्रभागातील नागरिकांना नाईलाजास्तव आणि स्वच्छता सभापतीच्या अकर्तबगारपणामुळे अक्षरशः नाक तोंड धरून रस्त्यावर फिरावे लागत आहे. ती अस्वच्छता साफ करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे काम आहे. मात्र जबाबदारीचे भान नसलेल्या आणि इतर विभागात तोंड खुपसायची सवय असलेल्या सभापतीने तर कमालच केली. तो सभापती नगर परिषदेमध्ये एका अधिकाऱ्याच्या (अभियंता) केबिनमध्ये गेला. त्यावेळी तो अधिकारी आपल्या कर्तव्यात मग्न होता. त्यांच्यावर असलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते आपले काम करीत होते. तेवढ्यात कान फुके रील्स स्टार महाशयांनी त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला. त्या अधिकाऱ्याने या… या… बसा…असे म्हणत आपले आमच्या विभागाकडे एखादे काम शिल्लक आहे का ? असेल तर सांगा ते लगेच करतो असे सांगितले. त्यावर हुशारकी मारणाऱ्या कान फुक्या रिल स्टारचे समाधान झाले नाही. तुला काय समजते का ? तुला माहीत नाही का मी कोण आहे ? लोकप्रतिनिधींचा आदर करण्यासाठी उठून का उभा राहिला नाहीस ? मी कोण आहे तुला माहीत नाही का? तुला बघायचे आहे का ? थांब मी तुला दाखवतोच माझा हिसका असे म्हणत त्या अधिकाऱ्याला दम देण्याचे काम केले. यावेळी त्याच्यासोबत दुसऱ्या विभागाचे सभापती व एक नगरसेवक सोबत होते. त्यांनीच त्या कानफुक्या रील्स स्टारला त्याच्या पदाची आणि जबाबदारी याची जाणीव करून दिली. त्या दोघांनीच अधिकाऱ्यांची बाजू घेतली आणि प्रकरण मिटवले. त्यानंतर त्यांनीच त्या फुशारकी मारणाऱ्या आणि सतत नवे कारनामे करणाऱ्या सभापती महाशयाला बाहेर घेऊन गेले.
आ राणाजगजितसिंह पाटील याकडे लक्ष देणार ?
आ राणाजगजितसिंह पाटील हे पहिल्यापासूनच लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाशी सौजन्याने बोलतात आणि वागतात देखील. मात्र, त्यांच्याच नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या आणि शहराची जबाबदारी सोपविलेल्या अशा कानफुक्या रील्स स्टारमुळे आ पाटील यांच्यासह पक्षाच्या व त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या चांगल्या कामाच्या प्रतिमेला देखील धक्का बसत आहे. हा एकच कारणामा नसून सतत काही ना काही कारनामे करत असल्यामुळे अशा पदाधिकाऱ्याला समज द्यावी किंवा पद मुक्त करावे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












