धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अर्चना पाटील यांची कृतज्ञता व्यक्त
महायुतीच्या नेतेमंडळींनी दिलेल्या संधीबद्दल आभार ग्रामीण विकास व पारदर्शक प्रशासनासाठी काम करण्याचा संकल्प
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर नूतन अध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुतीच्या सर्व नेतेमंडळींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच उपाध्यक्षपदी निवड झालेल्या शिवसेनेच्या उषाताई रवींद्र गायकवाड यांच्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना अर्चना पाटील यांनी सांगितले की, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवून काम करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार डॉ. तानाजीराव सावंत, माजी आमदार राजन साळवी यांच्यासह महायुतीतील सर्व मान्यवर नेतेमंडळींचे मनःपूर्वक आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महायुतीचे नेते ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, सुरेश बिराजदार, सुनील चव्हाण, दत्ताभाऊ कुलकर्णी, रिपाईचे राजाभाऊ ओव्हाळ, संताजी चालुक्य, अभय चालुक्य, राहुल पाटील सास्तुकर तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
“आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला पाठिंबा हीच आमच्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. या विश्वासाला पात्र ठरत धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनहिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे काम करू,” असा संकल्प अर्चना पाटील यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या सहकार्याने आणि जनतेच्या आशीर्वादाने धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीसाठी नवी दिशा व नवे बळ देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













