केवळ २१ व्या वर्षी धाराशिवची मिस. सबा रियाजोद्दीन शेख बनली चार्टर्ड अकाउंटंट… याबद्दल मोहसिन शेख व सत्तार शेख यांच्या वतीने सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिवची कन्या मिस. सबा रियाजोद्दीन शेख हिने केवळ २१ व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट बनून संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. The Institute of Chartered Accountants of India (ICAI) कडून नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सबाने सीए फायनलच्या दोन्ही गटांमध्ये उत्तीर्ण होऊन हे यश मिळवलं आहे.
विशेष म्हणजे, सबाने सीएच्या सर्व परीक्षा – Foundation, Intermediate आणि Final – पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या, जे तिच्या परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. सबाचं हे यश धाराशिव जिल्ह्यातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या यशानिमित्त धाराशिव येथील चार्टर्ड अकाउंटंट मोहसिन शेख यांच्या कार्यालयात सन्मान सोहळा पार पडला. या प्रसंगी दूरदर्शन इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा उद्योजक सत्तार शेख दोघांच्या वतीने मिस. सबा रियाजोद्दीन शेख आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रसिद्ध कर सल्लागार मोहसिन शेख यांनी या कार्यालयात प्रथमच आगमन झाल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
सबा रियाजोद्दीन शेख हिचं यश म्हणजे मेहनत, आत्मविश्वास आणि निश्चय यांचं जिवंत उदाहरण आहे. अशा तरुण पिढीमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं.
या कार्यक्रमाला अझर शेख, मजहर शेख, मोहसिन शेख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786














