• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

lokmadat news by lokmadat news
March 29, 2026
in क्राईम
0
0
SHARES
433
VIEWS

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग | अझहर शेख


नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गोवा गुटखा मोठ्या प्रमाणात वाहतूक करताना पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करून धमकी दिल्याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 48 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दि. 27 मार्च 2026 रोजी सकाळी 9.12 वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग बायपास रोडवरील निसर्ग हॉटेलजवळ पोलीस कर्मचारी शासकीय कामकाज करत असताना संशयास्पद आयशर टॅम्पो (क्र. MH 16 CD 2395) आढळून आला. तपासणी केली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानव आरोग्यास घातक असलेला गोवा गुटखा मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जात असल्याचे उघड झाले.
सदर वाहनातून 50 मोठ्या गोण्या गुटख्याच्या जप्त करण्यात आल्या. यासोबतच आयशर टॅम्पो, एक स्विफ्ट कार आणि तीन मोबाईल फोन असा एकूण 48,42,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपी संजय सुभाष जगताप (रा. वानेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), सचिन परमेश्वर पवर (रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड), सतीश तुकाराम सोंडगे (रा. गवळवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि मिट्टू उर्फ इंद्रजितसिंग रणजितसिंग ठाकूर (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी वाहन कारवाईसाठी ताब्यात घेत असताना आरोपींनी गाडी अडवून “गाडी सोडून दे, नाहीतर तुला बघतो” अशी धमकी देत पोलिसांना शासकीय कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर काही इसमांनी आरोपींना चिथावणी देत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी फिर्यादी दत्तात्रय माणिकराव कुंभार (वय 41) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. 28 मार्च 2026 रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 132, 223, 274, 275, 123, 45, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 59 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलिसांकडून सुरू आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल यात्राकाळात येरमाळा,शिंगणापूर, तुळजापूर,पंढरपूर यात्रेसाठी २०६ जादा बस ची सोय

Next Post

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

Related Posts

क्राईम

धाराशिव नगर परिषद पाण्यासाठी जनता त्रस्त… निर्जन भागात मात्र लाखोंच्या पाईपलाईन! यामागील मुख्य ‘आका’ कोण?

March 27, 2026
क्राईम

‘कला केंद्रां’च्या आड अनैतिक कारभार? विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

March 20, 2026
क्राईम

कलेच्या नावाखाली देहव्यापाराचा घृणास्पद प्रकार 4 कला केंद्रांवर रॅकेटचा पर्दाफाश, 9 आरोपींवर गुन्हा

March 20, 2026
क्राईम

गॅस टंचाई – फुटपाथवरील गरिबांवरच कारवाईचा बडगा मोठ्या हॉटेल्सवर प्रशासनाची ‘मौनसंमती’?

March 19, 2026
क्राईम

कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करताना जनावरे जप्त पोलिसांच्या तत्परतेमुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले

March 18, 2026
क्राईम

लोकमदत न्यूजच्या वृत्तांची दाखल थेट विधानसभेत आ. सुरेश धस यांची लक्षवेधी – बांधकाम कामगार घोटाळ्यावर कामगार मंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

March 17, 2026
Next Post

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या - आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

March 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT