• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासाः शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश.आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

lokmadat news by lokmadat news
October 26, 2025
in राजकारण
0
0
SHARES
9
VIEWS


धाराशिवकरांसाठी मोठा दिलासाः शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश

जनतेच्या साठ कोटींची बचत!

लवकरच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत. त्यामुळे आजच्या दराची तुलना केली असता सरकारचे अर्थात जनतेचे जवळपास साठ कोटी रुपये वाचणार आहेत. तुळजापूर आणि नळदुर्गबरोबरच हे काम सुरू झाले असते तर, कदाचित आत्तापर्यंत सत्तर टक्के काम पूर्णही झाले असते. आता कार्यारंभ आदेश झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

प्रतिष्ठान भवन येथे शनिवारी या अनुषंगाने महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरातील रस्त्यांच्या कामाचा प्रश्न आता निकाली निघाला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. या कामांसाठी एकूण १८ महिन्यांची कालमर्यादा असली तरीही कालमर्यादेच्या आत ही सगळे रस्ते अगदी दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पाठपुराव्याला मोठे बळ दिले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आपण स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन धाराशिव येथील भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. तिन्ही मान्यवरांनी अनुमती दिलेली आहे. तारीख निश्चित झाल्यावर तातडीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच बळ दिले आहे. आपल्या धारशिव शहरासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांसाठी १४० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून धाराशिव शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. शहरातील रस्त्यांसाठी एवढा ऐतिहासिक निधी यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या निधीच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचे काम आता वेगात केले जाणार आहे. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्यातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४० कोटी रूपयांच्या या विशेष प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, पालकमंत्री प्रताप सरनाईक, संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांचेही यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. वरील सर्वांचे सबंध धाराशिव शहरवासीयांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवादही मानले आहेत.

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलउपमुख्यमंत्री अजित पवारउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव शहर विकासनगर परिषद धाराशिवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
SendShareTweet
Previous Post

राजमुद्रा कट्टा नव्या तेजात… युवा उद्योजक राहुल गवळींचा स्वखर्चातून पुढाकार.. दिवाळीच्या प्रकाशात उजळला छत्रपती शिवाजी महाराज चौक

Next Post

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा…

Related Posts

राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
Next Post

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT