मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व एलईडी फोकस बसवून समाजहिताचा अनोखा उपक्रम
धाराशिव दि.२६(प्रतिनिधी):महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व धाराशिवचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित व आयोजित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, नेरूळ, नवी मुंबई यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात समाजहितासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदवला. एकूण १५५ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली तर ५५ रुग्णांना पुढील उपचारासाठी तेरणा ट्रस्ट, नेरूळ येथे रेफर करण्यात आले. तसेच ५७ लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले.
यासोबतच समाजसेवेचा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. धाराशिव फिजीकल अकॅडमी व वस्ताद परिवार धाराशिव यांच्या पुढाकाराने १०० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करून समाजाप्रती योगदान दिले.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रभाग क्र. ७ व ८ मध्ये ५० वॅट क्षमतेचे १०० एलईडी फोकस स्वखर्चाने बसवून परिसर उजळविण्यात आला.
आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर आणि प्रकाशयोजना या सर्व उपक्रमांमुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने हा आदर्श उपक्रम राबवण्यात आल्याने नागरिकांनी आयोजकांचे अभिनंदन करून आभार मानले.
लोक मदत न्यूज संपादक अमजद सय्यद धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधी नेमने आहेत इच्छुकांनी संपर्क साधावा 8390088786














