धाराशिव नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदी भाजपाने दिला सामान्य कार्यकर्त्याला न्याय – मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवे समीकरण
धाराशिव, दि. 15 जानेवारी 2026 (प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता शहराच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून पक्ष कोणाची निवड करणार यावर. या संपूर्ण निवडणुकीचे सूत्रे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतः हातात घेत कुशल नेतृत्व, अचूक नियोजन आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी प्रचारयंत्रणेमुळे भाजपाला घवघवीत यश मिळवून दिले.
नगरपरिषदेच्या 41 जागांपैकी तब्बल 22 जागांवर भाजपाने विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. या ऐतिहासिक विजयामागे मल्हार पाटील यांनी जिल्हाभर उभी केलेली युवकांची मजबूत फळी, नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्वतः नियंत्रणात ठेवत आखलेली रणनीती आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची शैली निर्णायक ठरली.
या पार्श्वभूमीवर उद्या, शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार असून ही जबाबदारी भाजपाने पार पाडण्याचे ठरविले आहे. विशेष बाब म्हणजे भाजपाने यावेळी केवळ निष्ठावान व कधीही बंडखोरी न केलेल्या, आमदार. पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आणि मल्हार पाटील यांचे खंदे समर्थक असलेल्या दोन पक्षकार्यकर्त्यांना संधी दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
भाजपाकडून दोन सदस्य स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमले जाणार असून, प्रथमच मल्हार पाटील यांनी स्वतंत्र यंत्रणा हलवीत स्वतः निर्णय घेत दोन युवा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. हे दोन्ही युवक गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी प्रामाणिक असून त्यांनी कधीही पक्षविरोधी भूमिका घेतलेली नाही किंवा बंडखोरीचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे पक्षाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी पहिल्या सहा महिन्यांसाठी नाव निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे अनेक अनुभवी व वजनदार नगरसेवक स्पर्धेत असताना, कमी मताधिक्याने निवडून आलेल्या एका नगरसेवकास उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. “कमी मताधिक्य, पण मोठी जबाबदारी” अशी चर्चा सध्या शहरभर रंगली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786














