• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

शालेय पोषण आहारातील तांदळाचा काळाबाजार :धाराशिव येथील वाहनावर औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई

lokmadat news by lokmadat news
September 13, 2025
in क्राईम
0
0
SHARES
1.5k
VIEWS

शालेय पोषण आहारातील तांदळाचा काळाबाजार :धाराशिव येथील वाहनावर औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई
लातूर दि.१३(प्रतिनिधी):गरीब विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शासनाकडून पुरवण्यात आलेला तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार सिंघम म्हणून ओळखले जाणारे औसा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या पथकाने उघड केला आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काचा घास लुटणाऱ्या या काळाबाजारू माफियांवर कठोर कारवाई करून शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी पालकांतून / जनतेतून होत आहे.
पोषण आहाराचा तांदूळ हा गरीब विद्यार्थ्यांचा जीवनदायी अन्न आहे. तो काळ्या बाजारात गेला तर विद्यार्थ्यांचे हक्क हिरावले जातात. हा गुन्हा केवळ विद्यार्थ्यांविरुद्ध नसून संपूर्ण समाजाविरुद्धचा गंभीर डाका आहे.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यात दीड, दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या (हेच वाहने) काळाबाजाराचा पर्दाफाश तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी केला होता. त्या वेळी बीड जिल्ह्यातील एका ठेकेदाराच्या मूक आदेशावरून  धाराशिव येथील वाहनांची अदलाबदल करून “घोटाळेबाज” आठ दहा वाहने लातूर जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराच्या वितरणासाठी नेण्यात आली होती. मात्र, त्याच वाहनांनी पुन्हा काळाबाजार सुरू केल्याचे औसा येथील प्रकरणावरून पुन्हा एकदा उघड झाले आहे. धाराशिव येथील गोडाऊन कीपर, दलाल वाहन चालक यांच्यावर कारवाई होऊन गोडाऊन कीपर सह दलाल याची झेलवारी देखील झाली होती,हीच मंडळी आता नव्या स्वरूपात सक्रीय झाल्याचे समोर आले आहे.
औसा पोलिसांनी अलीकडेच लातूर शहरातील एका पोषण आहाराचा तांदूळ टेम्पो क्रमांक MH 14 BJ 0786 हा काळया बाजारात (लातूर शहरातील मिल) पोहोचवला जात असतानाच औसा तालुक्यात रंगेहात पकडले. यामध्ये केवळ चालकावर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा संपूर्ण लातूर जिल्ह्यात पसरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या घोटाळ्यात गोडाऊन कीपर, मिल चालक, काही शाळांचे मुख्याध्यापक तसेच जिल्हा परिषदेतील काही अधिकारी / कर्मचारी यांची मिलीभगत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे .
विशेष म्हणजे, जिल्ह्यात सिंघम म्हणून ओळखले जाणारे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांनी शालेय पोषण आहाराशी संबंध असलेल्या जिल्हा परिषदेतील विभाग, गोडाऊन कीपर, सर्व वाहन धारकांचे रेकॉर्ड/ गाडीचे कागदपत्र, त्यांचा धाराशिव येथील रेकॉर्ड व जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंदी व दप्तर व सध्या स्थितीत उपलब्ध असलेल्या धान्याचा साठा तपासल्यास  या काळाबाजारामागील राज्यातील सर्वात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काची सर्रास लूट होत असल्याने दोषींवर कठोर कारवाई करूनच उदाहरण घालावे, अन्यथा शासनाचा “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” हा संकल्प केवळ कागदावरच राहील, अशी जनतेची प्रतिक्रिया आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची”
ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #धाराशिव #उस्मानाबादअभिमन्यू पवारअहमदपूरआमदारआमदार अमित देशमुखऔसाजिल्हा परिषद लातूरजिल्हा पुरवठा अधिकारी लातूरजिल्हाधिकारी लातूरतहसीलदार लातूरदलालनिलंगापोलीस अधीक्षक लातूरपोलीस ठाणे औसाभ्रष्टाचारमुख्य कार्यकारी अधिकारी लातूरमुरुडलातूरलातूर ग्रामीणशालेय पोषण आहार घोटाळास्थानिक गुन्हे शाखा लातूर
SendShareTweet
Previous Post

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने ठोकल्या बेड्या

Next Post

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्न

Related Posts

क्राईम

नियमभंग, गुन्हे आणि तक्रारींचा पाढा ‘महाकाली’ कला केंद्र ला सीलचा दणका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

February 26, 2026
क्राईम

धाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

February 25, 2026
क्राईम

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

February 15, 2026
क्राईम

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

February 12, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त …धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
Next Post

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT