• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

लातूर महामार्गावरील ब्लाईंड स्पॉट होणार दूर परिवहन व बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

lokmadat news by lokmadat news
August 25, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
35
VIEWS

धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) – धाराशिवहून बेंबळी मार्गे लातूरला जाणार्‍या प्रवाशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत. दिशादर्शक फलक, गतिरोधकाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. महामार्गावरील ब्लाईंड स्पॉट दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी परिवहन आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणांची संयुक्त पाहणी केली आहे.


धाराशिवहून लातूरला जाण्यासाठी एकूण तीन मार्ग आहेत. त्यातील ढोकी मार्गे असलेला रस्ता प्रचंड खराब असल्यामुळे प्रवाशी तुळजापूर अथवा बेंबळी मार्गे लातूरला जाण्यास प्राधान्य देतात. बेंबळी – उजनी – औसा मार्गे असलेला रस्ता प्रशस्त राज्य महामार्ग असल्यामुळे अलीकडच्या काळात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. असे असताना या महामार्गावरील काही ब्लाईंड स्पॉटमुळे अपघात ओढावू शकतात. त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची बाब लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर परिवहन विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी महामार्गाची संयुक्त पाहणी केली आहे. ज्या ठिकाणी तीव्र वळण आहे, त्या ठिकाणी क्रॅश बेरिअर सुविधा असणे आवश्यक आहे.

दिशादर्शक फलक, सूचना फलक आणि अन्य माहिती देणारे फलकही महामार्गावर लावण्याबाबत निर्णय झाला आहे. वेग मर्यादा, अरूंद पुल चिन्ह, प्रत्येक चौक आणि धोकादायक ठिकाणी गतिरोधक आणि रंबरल स्ट्रिप, काम सुरू असणार्‍या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना आणि रात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुविधेसाठी कॅटाईज प्रणाली राबविण्याबाबत या पाहणी दरम्यान ठरविण्यात आले असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान, सचिन बंग आणि बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.

Tags: dharashivlaturosmanabadॲक्सिडेंटउप प्रादेशिक परिवहन अधिकारीउस्मानाबादधडकधाराशिवलातूरसार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव
SendShareTweet
Previous Post

धान्याचे गोडाऊन फोडून हरभरा चोरी करून नेलेल्या आरोपींना एलसीबी ने  ठोकल्या बेड्या

Next Post

धाराशिव शहरात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

धाराशिव शहरात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT