तेरणा प्रकल्पात वाहून गेलेल्याचा मृतदेह नागुर शिवारात सापडला
लोहारा : निम्न तेरणा प्रकल्पात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह नागुर शिवारात सापडल्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली.
बालाजी त्र्यंबक मोरे (वय ४५, रा. नागुर, ता. लोहारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते दोन एकर शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीकडे जाण्यासाठी ओढा ओलांडत असताना ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते.
मोरे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मृतदेह तेरणा प्रकल्पातील नागुर शिवार परिसरात आढळून आला असून, पुढील कार्यवाही स्थानिक पोलिसांनी सुरू केली आहे.
लोकमदत न्यूज धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांसाठी तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इच्छुकांनी तात्काळ संपर्क साधावा संपर्क अमजद सय्यद 8390088786














