• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

महाबोधी महाविहारसह इतर बौद्ध स्थळे मुक्तीसाठी बौद्धांचा जन आक्रोश

lokmadat news by lokmadat news
September 17, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
17
VIEWS

महाबोधी महाविहारसह इतर बौद्ध स्थळे मुक्तीसाठी बौद्धांचा जन आक्रोश

अन्यायकारक बीटी ॲक्ट रद्द करण्याची मागणी

धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) – बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार पुरोहित मुक्त करण्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू व दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी या मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभा दक्षिणच्यावतीने दि.१७ सप्टेंबर रोजी महा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रखरखत्या उन्हात मोर्चेकर्‍यांनी रस्त्यावर बसून महाबोधी महाविहार, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू आणि दीक्षाभूमी पुरोहित मुक्त करा, आदी मागण्या करीत गगनभेदी घोषणांनी एक तासभर परिसर दणाणून सोडला.


बिहार राज्यामधील बोधगया येथील महाबोधी विहारावर पुरोहितांनी ताबा मिळवला आहे. त्यामुळे ते बौद्धांच्या ताब्यात देऊन महाबोधी विहार पुरोहित मुक्त करावे. तर मध्य प्रदेशातील महू हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेल्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दीक्षा घेतलेली दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहरातील भीम नगरमधील क्रांती चौकातून दुपारी साडेबारा वाजता आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मारवाड गल्ली, काळा मारुती चौक, पोस्ट कार्यालय चौक, अंबाला हॉटेल, छत्रपती संभाजी महाराज चौक, संत गाडगेबाबा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास धडकला. यावेळी या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या दिल्यामुळे रस्ता दुतर्फा बंद झाल्यामुळे दुतर्फा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मात्र, या दरम्यान दोन रुग्णवाहिका आल्या, आंदोलकांनी क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करुन दिला. यावेळी उपस्थित आंदोलकांना कराळी येथील भन्ते सुमंगल, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड अजित डिकले, रिपाइंचे राज्य जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजश्री कदम, दक्षिण जिल्हा संघटक सुधीर कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे व उत्तरचे सरचिटणीस दिलीप निकाळजे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे रखरखत्या उन्हात पंचशील व बुद्ध वंदना करीत तथागत गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश देण्यात आला.    यावेळी विश्वास पांडागळे, संस्कार उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे, बागडे शरद, सचिन दिलपाक, अनिल सरतापे, किरण धाकतोडे, बाबासाहेब बनसोडे, सुधीर कांबळे, सुधाकर गायकवाड, ब्रह्मानंद गायकवाड, तानाजी माटे, वैभव सिरसाट, आनंदकुमार कांबळे, विजयमाला धावरे, आर.टी गायकवाड, सुभाष सोनवणे, बाबासाहेब घरबुडवे, राजेंद्र धावरे, विठ्ठल सुरते, राकेश जेटीथोर, विनोद आचार्य, बाळासाहेब खरोसे, दिपक सोनकांबळे, धनंजय वाघमारे, बापू जावळे, गौतम हुंबे, राजाभाऊ बनसोडे, राजाभाऊ कदम, संतोष सुरवसे, अंकुश भंडारे, आम्रपाली गोटसुर्वे, सीताताई सोनवणे, रोहिणी बर्वे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, संजय बनसोडे, सिद्धार्थ ओहाळ, रणजीत गायकवाड, सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब माने, धम्मशील कदम, बाबासाहेब मस्के, मुकेश मोठे, संतोष झेंडे, अंकुश नटराज, संदीप अंकुश,  वंचितचे मिलिंद रोकडे, तानाजी बनसोडे, युवकचे शीतल चव्हाण, महिला आघाडीच्या अनुराधा लोखंडे, रुक्कमीन बनसोडे, बाबासाहेब वाघमारे, सागर चंदनशिवे, मिलिंद रोकडे, जीवन कदम, ज्ञानेश्वर बनसोडे, जिवन कदम, भारतीय बौद्ध महासभा जि.शा.उत्तरचे जिल्हाध्यक्ष हनुमंत प्रतापे, सरचिटणीस दिलीप निकाळजे यांच्यासह भारतीय भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव (द) व समता सैनिक दल, बी आर आंबेडकर ग्रुप, भारतीय बौद्ध महासभा उत्तर, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्यासह विविध संस्था व संघटनाचे कार्यकर्ते पदाधिकारी जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv lokmadat newsdharashiv osmanabad जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदआंदोलनउग्र आंदोलनउस्मानाबादचैत्यभूमीजन आक्रोशजय भीमजिल्हाधिकारीदीक्षाभूमीधाराशिवनागेशनगरीमोर्चारस्ता रोको
SendShareTweet
Previous Post

धाराशिव  जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा. डॉ. प्रतापसिंह पाटील 

Next Post

धाराशिव शहरातील स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

धाराशिव शहरातील स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT