दर्पण दिनानिमित्त शहर काँग्रेसकडून पत्रकारांचा सन्मान
धाराशिव, प्रतिनिधी :
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दर्पण दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पत्रकारांना पेन व डायरीचे वाटप करून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वासआप्पा शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्यरवींद्र केजकर, स्मिता शहापूरकर,संतोष जाधव उमेश राजेनिंबाळकर,सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत,अझर पठाण,अक्षय जोगदंड,गणेश पवार,धवलसिंह लावंड,हनुमंत सांगवे,अब्दुल लतीफ,मोईज भाई,अभिषेक बगल,आदी पत्रकार व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वक्त्यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा आढावा घेतला. तसेच बदलत्या युगात चौथ्या स्तंभाची भूमिका, माध्यमांपुढील आव्हाने, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि सत्य, निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी स्वतंत्र, निर्भय आणि जबाबदार पत्रकारितेची नितांत गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकारांचे आभार मानण्यात आले.













