धाराशिव आगारातील आगार व्यवस्थापकाचा प्रवाशाच्या जीवाशी खेळ
धाराशिव आगारातील आगार व्यवस्थापक यांच्या निष्काळजीपणामुळे बस वेळेवर न सोडणे लांबपल्याच्या गाड्या दुरुस्ती अवस्थेत असलेल्या सोडणे अशा प्रकारचे प्रकार व्यवस्थापकाकडून सर्रासपणे सुरू आहेत. आज दिनांक 3/12/ 25 रोजीधाराशिव – पुणे ही 12 ची गाडी दोन वाजता सोडण्यात आली,आणि 2 वाजता सुटणारी गाडी 2.45ला लावण्यात आली. MH 20 BL258९ ही गाडी एकदम निकृष्ट दर्जाची लावण्यातआली, गाडीमध्ये स्टेफनी दोऱ्याने बांधलेली होती, गाडीच्या पाठीमागच्या टायरचे दोन नट बोल्ट निघालेल्या अवस्थेत आढळून आले त्याचबरोबर पाठीमागच्या चाकाचे नट बोल्ट हे दोऱ्याने आवळलेले दिसून आले. अशा अवस्थेतील गाडी लांब पाल्यालालावून धाराशिव आगारातील आगार व्यवस्थापक प्रवाशाच्या जीवाशी खेळत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब आगार व्यवस्थापकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर पाच मिनिटात दुसरी गाडी लावतो असे सांगून साहेबांनी एक तास उशिराने गाडी बदलून देण्याचे काम केले. आगार व्यवस्थापकाला या गाडीच्या संदर्भाने विचारनाकेलीअसता उडवा उडीचे उत्तरे देऊन गाडी बदलून देण्यास स्वतः आगार व्यवस्थापकांनी विलंब लावला त्यामुळे प्रवाशांना पुणे या ठिकाणी जाण्यासाठी दिरंगाई झालेली दिसून आली. निदान लांब पल्ल्याच्या गाड्या तरी चांगल्या कंडीशन मध्ये असल्याच्या बघूनच पाठवाव्या असे सांगितले असतानाही याकडे त्यांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही मोबाईल स्विच ऑफ झाला आहे असे कारण सांगून ते तेथून निघून गेले हे त्यांचे जाणे म्हणजे प्रवाश्यांची आपले काही घेणेदेणे नाही अशा अविर्भावातून ते त्या ठिकाणाहून निघून गेले. शेवटी 2वाजतापुण्याला जाणारी गाडी 4 वाजता आगारातून मार्गस्थ झाली त्यामुळे प्रवाशांची प्रचंड प्रमाणात हेळसांड झाली याला पूर्णपणे जबाबदार आगार व्यवस्थापक आहेत. गाडीमध्ये स्टेफनी ठेवून चाकांना पूर्ण नटबोल्ट नसणारी गाडीतसेच मध्ये खिडक्या च्या शेजारी पाईप तुटलेले अशी गाडी लांब पाल्यालालावून आगार व्यवस्थापकाने प्रवाशाच्या जीवाची हेळसांड करण्याचे कामकेलेले आहे ही गंभीर बाब असून याकडे विभाग नियंत्रकांनी लक्ष देऊन लांब पल्ल्याच्या गाड्या चांगल्या अवस्थेतील सोडण्याचा प्रयत्नकरावा अशी मागणी प्रवासी करत असल्याचे निदर्शनासआलेआहे.आजघडलेल्याप्रसंगाचीतक्रार ही विभाग नियंत्रकाकडे प्रवाशांनी दिलेली आहे. विभाग नियंत्रक यामध्ये कोणती भूमिका घेतात याकडेही प्रवाशाचे लक्ष आहे. वरील सर्व गंभीर बाब आगार व्यवस्थापकाच्या लक्षात आणून देऊन, गाडी बदलून घेण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते उमेश सिरसाठे यांनी केले आहे.
















