अतिवृष्टीग्रस्तांसाठी धाराशिव भाजपचा हातभार..
मुख्यमंत्री म्हणाले, अरे व्वा.. !
सामाजिक बांधिलकी जोपासत भारतीय जनता पक्ष धाराशिव जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वयंस्फूर्तीने देणगी जमा केली. आज या देणगीतून प्राप्त झालेले एकूण २३७ चेक धाराशिव जिल्ह्याचे संवेदनशील, दमदार व कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे स्वहस्ते सुपूर्द केले.यावेळी युवा नेते मल्हार पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते..
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले की, “धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे नेहमीच सामाजिक जबाबदारीला प्राधान्य देत असतात. संकटाच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा गरजूंसाठी मोठा आधार ठरतो आणि या निधीसाठी धाराशिव भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे मनःपूर्वक कौतुक करत आभार व्यक्त केले.
भाजपच्या या उपक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यातील जनतेमध्ये जनसेवेची भावना अधिक दृढ झाली असून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












