धाराशिव शहर पोलिस ठाण्याचा उपक्रम…स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
वर्षभर स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव शहर पोलिस ठाण्याच्या वतीने नगर परिषद स्वच्छता विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. दिवाळीच्या निमित्ताने पोलिस ठाण्यात स्वच्छता राखणाऱ्या या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
नगर परिषद स्वच्छता विभागाच्या महिला कर्मचारी वर्षभर धाराशिव शहर पोलिस ठाण्यात स्वच्छतेचे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. त्यांच्या सेवेला आदर देत पोलिस निरीक्षक कुमार दराडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. जी. अंभोरे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले.
या वेळी स्वच्छता कर्मचारी महिलांनी पोलिस अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गानेही या उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या वेळी पोलिस आमलदार रिजवान बेग, महिला पोलिस नाईक डी. बी. उंद्रे, तसेच पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि नगर परिषद स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
या उपक्रमामुळे पोलिस विभाग व स्वच्छता कर्मचारी यांच्यात आपुलकीचे बंध अधिक दृढ झाले असून, सामाजिक जाणीवेचा एक सकारात्मक संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












