• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ. नीता अंधारे यांचा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार

lokmadat news by lokmadat news
September 2, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
73
VIEWS

धाराशिव : धाराशिव नगरपालिकेच्या नूतन मुख्याधिकारी सौ. नीता अंधारे यांचा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील विविध समस्या, स्वच्छता, कचरा डेपो, कर वसुली तसेच विकास कामांच्या अडचणी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्वच्छतेबाबत जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्याधिकारी अंधारे म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांपासून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी न मिळाल्याने शहरातील स्वच्छतेची समस्या गंभीर झाली आहे. मात्र, लवकरच त्यावर तोडगा काढून स्वच्छतेचे काम गतीमान करण्यात येईल.

धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलवण्या संदर्भात अमजद सय्यद यांनी विचारले असता मुख्याधिकारी सौ. अंधारे यांनी सांगितले की, धाराशिव शहरातील वाढती लोकसंख्या पाहता विद्यमान कचरा डेपो लहान पडत असून कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वीच डेपो हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती लवकरच मार्गी लागेल. वडगाव सिद्धेश्वर येथील एमआयडीसी परिसरात नवीन कचरा डेपो प्रकल्पाचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर विद्यमान ठिकाणी बायोमायनिंग खात निर्मिती प्रकल्प राबविण्याचा शासन स्तरावर पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच, नगरपालिकेच्या उत्पन्न-खर्चातील तफावत आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. कर वसुली वाढविण्यासाठी राज्य शासनाची अभय ही प्रोत्साहनपर  एक महत्त्वाची योजना असून, याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे त्यात सरासरी 50 टक्के सवलतीसह थकबाकी वसुलीचा लाभ मालमत्ताधारकांना मिळणार आहे. याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच शहरवासीयांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे वसुली वाढेल आणि विकासकामांना चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्याधिकारी अंधारे म्हणाल्या की, “मी नुकताच पदभार स्वीकारून एक महिना पूर्ण केला आहे. शहरातील विविध भागांचा आढावा घेतला असून जुन्या-नव्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहर व्यवस्थित करण्यासाठी काही काळ लागणार आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास स्वच्छ, सुंदर आणि सुबक धाराशिव घडविण्यास मदत होईल.”

व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा दैनिक प्रजापत्रचे जिल्हा प्रतिनिधी हुंकार बनसोडे आणि दैनिक उज्वलकाळ चे संपादक अरुण गंगावणे यांनी मुख्याधिकारी सौ. अंधारे यांचा सत्कार केला. यावेळी पुढारचे संपादक किशोर माळी, के न्यूजचे संपादक किरण कांबळे, एस पी न्यूज 24 चे संपादक मुस्तफा पठाण, लोकमदत न्यूजचे संपादक अमजद सय्यद आदी पदाधिकारी व  पत्रकार बांधव उपस्थित होते.

Tags: codharashivdharashiv collectornagar vikas mantriosmanabad cityosmanabad jilhadhikariधाराशिवनगर परिषद मुख्याधिकारी
SendShareTweet
Previous Post

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता परिवहन मंत्री सरनाईक

Next Post

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT