• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

lokmadat news by lokmadat news
February 27, 2026
in राजकारण
0
0
SHARES
35
VIEWS

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

शहर कचर्‍यात, निधी मात्र आलिशान गाडीत? आठवडी बाजारात ठेकेदारीचा डाव; शेतकऱ्यांवर अन्याय, महिलांच्या शौचालयालाही निधी नाही – धाराशिव अर्थसंकल्पावर संतापाचा स्फोट!

धाराशिव – लोकमदत न्यूज

धाराशिव नगर परिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ३१४ कोटी २१ लाख ५४ हजार ८७५ रुपयांचा अर्थसंकल्प लेखा अधिकारी तनवीर जमादार यांनी सभागृहात वाचून दाखविला. नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प सादर झाला. मात्र, या अर्थसंकल्पातील प्राधान्यक्रमांवरून शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
४० लाखांची वाहनखरेदी; स्मारकांसाठी शून्य निधी
नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसाठी फिरण्याकरिता ४० लाख रुपयांची वाहनखरेदी तरतूद करण्यात आली आहे. दुसरीकडे राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी एक रुपयाचीही तरतूद नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे  “सत्ताधाऱ्यांना वाहन महत्त्वाचे, पण इतिहास-परंपरेचा सन्मान नाही,” अशी टीका विरोधकांनी केली.
शिलकीचा दावा; आकड्यांत विसंगती?
५ लाख ८१ हजार ५१३ रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केल्याचा दावा करण्यात आला. महसुली जमा ५८.८४ कोटी, खर्च ५८.८० कोटी; भांडवली जमा २५४.६३ कोटी, खर्च २५४.३४ कोटी असा अंदाज आहे. प्रारंभीची शिल्लक ७४.०६ लाख दाखवली असली तरी एकूण जमा-खर्चाच्या आकड्यांत विसंगती असल्याची चर्चा सभागृहाबाहेर रंगली.
घनकचरा व्यवस्थापनात ‘कात्री’; नदी संवर्धनाला शून्य
शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर वर्षाला सुमारे ८ कोटींचा खर्च येतो. मात्र अर्थसंकल्पात फक्त २ कोटींची तरतूद आहे. त्यामुळे “शहर पुन्हा कचर्‍यात बुडणार का?” असा सवाल उपस्थित झाला आहे. नदी संवर्धन योजनेसाठी एक रुपयाचीही तरतूद नाही; रस्ता फंडालाही निधी नाही.

महिलांच्या शौचालयाचा विसर
जिल्ह्याचे मुख्यालय असतानाही वरदळीच्या ठिकाणी मुख्य बाजारपेठेत महिलांसाठी सार्वजनिक शौचालयासाठी एक रुपयाचीही तरतूद नसल्याचे शिवसेना (ठाकरे)चे नगरसेवक राजाभाऊ पवार यांनी निदर्शनास आणले. “महिलांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, पण आलिशान गाडीला मंजुरी,” अशी जोरदार टीका सर्वसियांतून होत आहे.

आठवडी बाजारात ठेकेदारी; शेतकऱ्यांवर भार?
आठवडी बाजारातील कर वसुलीसाठी ठेकेदार नेमण्याचा ठराव पारित झाला. भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून अवाच्या सवा जागाभाडे वसुली करण्यात येणार असून वसुलीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “महसूल वाढवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून, सदरील निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

शहर विकास की खर्चाची उधळपट्टी?
शहरात एकही नवीन उद्यान नाही, कचरा डेपो स्थलांतराचा ठोस आराखडा नाही, रस्त्यांसाठी निधी नाही—अशा पार्श्वभूमीवर ४० लाखांची वाहनखरेदी ही ‘प्राधान्यांची उलटसुलट मांडणी’ असल्याची टीका चोहोबाजूने होत आहे. विविध पक्षाच्या नेते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते लवकरच या संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन निर्णय मागे घेण्याची मागणी करणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
एकूणात, ३१४ कोटींच्या अर्थसंकल्पात विकासाच्या मूलभूत गरजांपेक्षा सत्ताधाऱ्यांच्या सोयींना प्राधान्य दिल्याचा आरोप होत असून, शहरात या निर्णयांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

Next Post

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

Related Posts

राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

February 27, 2026
राजकारण

लोकमदत न्यूजचा दणका सत्ताधाऱ्यांना उशिरा का होईना जाग!
शिवसेना (उ.बा.ठा.) नगरसेवकांचा पुढाकार अजितदादांना सभागृहात पुन्हा श्रद्धांजली

February 27, 2026
राजकारण

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर “या” ताराखेला होणार निवड

February 27, 2026
Next Post

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT