धाराशिव दि.०८(प्रतिनिधी): “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!” अशा जयघोषात धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस परिवहन कार्यालयातील गणरायाला रविवार (दि.७) मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत जिल्ह्यातील पोलीस दल अखंडपणे बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत होते. त्यामुळे पोलिसांना आपल्या गणरायाच्या विसर्जनावेळी मनसोक्त उत्सव साजरा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
विशेष म्हणजे, या मिरवणुकीत कुठल्याही डीजे किंवा ध्वनीप्रदूषण करणाऱ्या यंत्रणेचा वापर न करता, पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात गणरायाला निरोप देण्यात आला. खाजगी वाहनावर गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालावर पोलिसांनी नाचत-गाजत आपल्या गणरायाला निरोप दिला.
पोलिस कर्मचाऱ्यांनी हसत-खेळत, भक्तीभाव आणि उत्साहात गणरायाच्या विसर्जनात सहभाग घेतला. यावेळी “गणपती बाप्पा मोरया!” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












