ठाणे मनपाच्या निवडणुकीत नितीन (दादा) लांडगे अपक्ष मैदानात…तळागाळात थेट संपर्कातून प्रचारात आघाडी
ठाणे दिनांक ११(अमजद सय्यद):ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ ड मधून नितीन (दादा) सुबराव लांडगे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णायक पवित्रा घेतला असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यात बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असलेले तसेच पक्षासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणून नितीन लांडगे यांची ओळख आहे. धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र असलेले नितीन लांडगे हे ठाणे युवा सेनेचे लोकसभा अध्यक्ष, कोर कमिटी सदस्य, युवा सेना राज्य समन्वयक, तसेच शिवसेना धाराशिव जिल्हा निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत असून धाराशिव व कळंब विधानसभा मतदारसंघाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली होती मात्र त्यांनी सर्व पदांचा राजीनामा देऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. तरीही माघार न घेता, “कडवट शिवसैनिक कधीही मैदान सोडत नाही,” हे दाखवून देत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सध्या प्रचार अंतिम टप्प्यात असून नितीन लांडगे यांनी प्रचारामध्ये वेगळीच छाप पाडली आहे. युवकांची मोठी फळी उभी करत त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे. नालीमध्ये उतरून, पहाटे व्यायाम करणाऱ्या जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून, गल्लीबोळात, बाजारपेठेत, चहाच्या टपरीवर, पान टपरीवर जाऊन ते थेट मतदारांशी संपर्क साधत आहेत. ही थेट लोकसंपर्काची पद्धत नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यांच्या प्रचार रॅलींमध्ये हजारो युवक – युवती, महिला व जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून, हा वाढता प्रतिसाद त्यांच्या विजयाच्या दिशेने इशारा करत असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे. ठाण्यात वास्तव्यास असूनही धाराशिवच्या सुपुत्राने ठाण्यात आपले स्वतंत्र वर्चस्व निर्माण केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, युवा सेनेच्या माध्यमातून संघटन मजबूत करणे, आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झगडणे, या कार्यामुळे नितीन लांडगे यांना मोठा जनाधार मिळत आहे. मातब्बर पक्षांना आव्हान देत अपक्ष म्हणून उभे राहण्याचा त्यांचा निर्णय मतदारांमध्ये नवा उत्साह निर्माण करत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून एकनिष्ठ शिवसेनेचे कार्य करणारे नितीन दादा लांडगे आजही “कडवट मावळा” व “कडवट शिवसैनिक” म्हणून ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर ठाणे मनपा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, प्रचारातील आघाडी पाहता नितीन लांडगे ही निवडणूक मोठ्या रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786














