धाराशिव – शासनाच्या निर्देशानुसार तसेच पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्या आदेशाने जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कारवाईसाठी Anti Narcotics मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन करणे, बाळगणे, वाहतूक करणे, विक्री अथवा खरेदी करणे तसेच यासंबंधित कोणतीही बेकायदेशीर कृती करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती असल्यास ती तात्काळ कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी अशी माहिती मोबाईल क्रमांक 8999890498 वर व्हॉट्सअॅप, एसएमएस किंवा कॉलद्वारे कळवावी. तसेच antinarcodhv@gmail.com या ई-मेलवरही माहिती पाठवता येईल.
माहिती देणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना अंमली पदार्थमुक्त धाराशिव घडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.












