प्रभाग क्रमांक २० मध्ये विलास (बापू) लोंढे यांच्याकडून १२७५ दिवाळी किट वाटप – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
धाराशिव (प्रतिनिधी):भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व सर्वसामान्य जनतेच्या अडचणीसाठी तत्पर असलेले विलास (बापू) लोंढे यांनी या वर्षीही आपल्या परंपरेला पुढे नेत प्रभाग क्रमांक २० मधील नागरिकांसाठी १२७५ दिवाळी फराळ कीट वाटपाचे आयोजन केले.
या उपक्रमाचा शुभारंभ भाजपा नेते व मित्राचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभागातील महिलांना प्रत्यक्ष हातांनी कीट देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विलास बापू लोंढे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य, मदतीचा हात आणि सेवाभावासाठी ओळखले जातात. एखाद्याला दवाखान्याचा प्रश्न असो, पोलीस ठाण्याशी संबंधित अडचण असो किंवा आर्थिक संकटात सापडलेला सामान्य नागरिक विकास लोंढे नेहमी मदतीसाठी धावून येतात.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी दीपावली निमित्त गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना आनंद देण्यासाठी फराळ किट वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला.जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा नेते नितीन काळे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे विलास बापू लोंढे नेहमीच कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतात.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विलास लोंढे यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक करत सांगितले की, “लोंढे यांच्या रूपाने भाजपा पक्षाला एक कार्यतत्पर, जनसेवेसाठी झटणारा कार्यकर्ता लाभला आहे.”
प्रभाग क्रमांक २० मधील शेकडो महिलांनी आणि नागरिकांनी विलास बापू लोंढे यांचे मनःपूर्वक आभार मानले. दिवाळीच्या उत्सवात त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे आनंदाची लहर पसरली आहे.
संपादक अमजद सय्यद 8390088786















