धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धडक
आठ जणांना अटक – ३ लाख ४२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी):धाराशिव गावसुद गावाजवळ तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकून आठ जणांना अटक केली. या कारवाईत रोकड, मोबाईल, मोटारसायकली व जुगार साहित्य असा तब्बल ३,४२,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोका/७८६ अनिल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. १७५/२५, कलम ४ व ५ महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये १) शाहेद सलाउद्दीन शेख (वय ४०, रा. खाजा नगर, धाराशिव) २) देविदास केरबा सोनवणे (वय ५३, रा. भीम नगर धाराशिव) ३) जुबेर जमील शेख (वय ४०, रा. खाजा नगर, धाराशिव) ४) बाळासाहेब गणेश काकडे (वय ६५, रा. निंबाळकर गल्ली, धाराशिव) ५) रफिक लाला शेख (वय ४२, रा. खाजा नगर, धाराशिव) ६) शेखर संदिपान शिंदे (वय ३१, रा. देशपांडे स्टॅन्ड, धाराशिव) ७) सिद्धांत अरुण बनसोडे (वय ३४, रा. भीम नगर, धाराशिव) ८) सचिन सुनील मोटे (वय ३०, रा. भीम नगर धाराशिव) यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे. उप उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमधील आरोपीकडून मोबाईल फोन मोटारसायकली – एमएच-२५-बीसी-१७९६, एमएच-२५-एएस-४३५८, एमएच-२५-एयू-६२८५, एमएच-४५-एजी-४२९७, एमएच-२५-बीडी-३१८ जुगार साहित्य – तिरट पान, पत्ते, चिठ्ठ्या, रोकड व इतर साहित्य असा एकूण ₹३,४२,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरील कारवाई दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता गुप्त माहितीच्या आधारे शाहिद शेख रा. खाजा नगर, धाराशिव यांच्या गावसूद गावाजवळील शेतात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा टाकण्यात आला असून तेथे आरोपी तिरट जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहात पकडले. तेथील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन जुगार साहित्य, रोकड, मोबाईल व मोटारसायकली असा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव येथील अधिकारी व कर्मचारी ज्यामध्ये पोह/हुसेन सय्यद, पोह/गरड, पोना/पाटील, पोअं/अनिल, ठाकूर, गरड, चापोह/लाटे आदींच्या पथकाने केली. या संदर्भात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. या धडक कारवाईमुळे धाराशिव शहर व परिसरातील जुगार धंद्यांना मोठा आळा बसणार असून, नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.
प्रभारी पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात अवैध धंदे जुगार विरुद्ध पोलिस कारवाई जोरदारपणे सुरू आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव शहरात विविध ठिकाणी चोरी-छुपे क्लब चालवले जात आहेत — धारासुर मर्दिनी देवी मंदिराच्या पाठीमागील भाग, बेंबळी रोड परिसर, बांगड ऑईल मिल सोलापूर रोड परिसर, वरुडा रोड उड्डाण पूल पलीकडील भाग आणि टापरे बिल्डिंगच्या पाठीमागील परिसर यांसारख्या ठिकाणी चोरून क्लब सुरू आहेत अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. नागरिक व स्थानिक समाजाने या संदर्भात तक्रारी केल्या.! असून, जनतेकडून पोलीस अधीक्षकांनी कायमस्वरूपी स्वतंत्र पथक निर्माण करून या प्रकारावर सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांनी सुरू केलेल्या या धडक मोहीमेमुळे जिल्हा पातळीवर त्यांचे अभिनंदन होत आहे.


लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786











