• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

कार्यकर्त्यांची निवडणूक की कुटुंबीयांचे पुनर्वसन? – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घराणेशाहीचा पर्दाफाश

lokmadat news by lokmadat news
February 12, 2026
in राजकारण
0
0
SHARES
676
VIEWS

“कार्यकर्त्यांची निवडणूक की कुटुंबीयांचे पुनर्वसन? — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घराणेशाहीचा पर्दाफाश”

लोकमदत न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा उत्सव, अशी मोठमोठी आश्वासने सर्वच पक्षांकडून दिली जातात. “स्थानिक नेतृत्वाला सर्वाधिकार”, “कार्यकर्त्यांच्या कष्टाला न्याय”, “घराघरातील कार्यकर्ते पुढे आणू” अशा घोषणा निवडणुकीच्या तोंडावर हमखास ऐकायला मिळतात. मात्र नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी या घोषणांचा फोलपणा पुन्हा एकदा उघड केला आहे.
कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून मिरवणूक काढणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांनी प्रत्यक्षात आपल्याच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून “ही निवडणूक खरंच कार्यकर्त्यांची होती की नेत्यांच्या कुटुंबीयांची?” असा सवाल उपस्थित होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तेर जिल्हा परिषद गटातून पत्नी अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देत त्यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. सर्व प्रतिष्ठा पणाला लावत त्यांनी पत्नीला विजयी करून आणले.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी पत्नी उषा रवींद्र गायकवाड यांना कदेर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळवून देत त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. शिंदे गटाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुलगी आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांना केसरजवळगा पंचायत समिती गणातून निवडून आणले. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांनी मुलगी श्रुती मोहन पनुरे यांना जेवळी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देऊन विजयी करण्यासाठी प्रयत्न केले,
भाजपचे कैलास शिंदे हे स्वतः उमरगा तालुक्यातील भूसणी पंचायत समिती गणातून विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाचे धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांनी आपल्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील यांना कानेगाव जिल्हा परिषद गट मधून उमेदवारी मिळवून देत विजय मिळवून दिला.
काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचे नातू तथा भाजप नेते सुनील चव्हाण यांनी पुत्र रणवीर सुनील चव्हाण यांना आणदूर पंचायत समिती गणातून निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पत्नी सविता सुरेश बिराजदार यांना बलसुर जिल्हा परिषद गटातून विजयी करून आणले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका धुरगुडे हे स्वतः बेंबळी जिल्हा परिषद गटातून विजयी झाले.
या सर्व घटनांमुळे “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे व्यासपीठ” ही संकल्पनाच प्रश्नांकित झाली आहे. निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांच्या नावाने भाषणे करणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्षात मात्र घराणेशाहीला खतपाणी घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज राजकीय पक्षांमध्ये वर्षानुवर्षे झटणारे कार्यकर्ते उमेदवारीपासून वंचित राहतात, तर नेत्यांचे कुटुंबीय थेट राजकारणात उतरताना दिसतात. त्यामुळे “ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या भविष्यासाठी होती की नेत्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी?” असा रोखठोक सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे खरे उद्दिष्ट म्हणजे तळागाळातील नेतृत्व घडवणे. मात्र या निवडणुकांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की राजकारणात अजूनही घराणेशाहीचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीवर राजकीय नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असून, खऱ्या अर्थाने सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धाडस कधी केले जाणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

Related Posts

राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
राजकारण

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

February 27, 2026
Next Post

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT