• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

वक्फ मंडळाच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढून नियमानुसार केलेल्या बांधकामांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – समीर काझी  राज्य वक्फ मंडळ अध्यक्ष

lokmadat news by lokmadat news
September 9, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
67
VIEWS

धाराशिव दि. ९ (प्रतिनिधी) वक्फ मंडळाच्या शहरी भागातील जमिनीवर अतिक्रमणे करण्यात आली आहे.धाराशिव शहरातही हे दिसून येत आहे.वक्फ मंडळाच्या जमिनीवर जे अतिक्रमण केले आहे,त्यावर नियमानुसार कारवाई करून अतिक्रमण काढण्यात येतील आणि ज्या जमिनीवर नियमानुसार बांधकाम झाले आहे त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. असे निर्देश महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिले.

वक्फ मंडळाच्या जमिनीवरील अतिक्रमण व महसुली अभिलेखातील नोंदीबाबत काझी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली,यावेळी ते बोलत होते.या बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अरुणा गायकवाड उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,संजय पाटील,जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद आमेर,सर्व तहसीलदार व सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.

काझी म्हणाले की,विविध विभागाशी संबंधित असलेल्या वक्फ मंडळाच्या अडचणी दूर व्हाव्यात हा या बैठकीचा उद्देश आहे.वक्फ मंडळाच्या जमिनीवर बांधकामाची परवानगी मागितली तर नियमानुसार परवानगी देण्यात येते.काही ठिकाणी शासकीय कार्यालये ही वक्फ मंडळाच्या जमिनीवर आहे.त्याबाबत शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.वक्फ मंडळाच्या जमिनीवर कोणी अतिक्रमण करत असतील, जबरदस्तीने त्या जमिनी ताब्यात घेत असतील तर योग्य ती कारवाई करण्यात येईल व संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येईल.असे काझी यांनी सांगितले.

वक्फ बोर्डाच्या जमिनीची नोंद सातबारावर घेण्यात येईल व बोर्डच्या अनुषंगाने महसूल विभाग सहकार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा वक्फ अधिकारी आमेर यांनी नवीन वक्फ अधिनियम या अंतर्गत वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण,मालमत्तांचे फेरफार नोंदी घेणेबाबत,वक्फ मंडळाचे निर्देश व नवीन वक्फ मालमत्तांची नोंदणी,वक्फ मालमत्ता अवैध हस्तांतरणबाबत, व्यवस्थापनाचा ताबा हस्तांतरित करणे,वक्फ मालमत्तांच्या भूसंपादनाबाबत,महसूल विभागाच्या १३ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, वक्फ जमिनीचे भूसंपादन,वक्फ जमिनीवरील अतिक्रमणाबाबत उम्मीद कायदा १९९५ च्या कलम ५४ अंतर्गत अतिक्रमण काढणे,वक्फ जमीन खालसा,वक्फ मालमत्ता नसल्याचे ना हरकत,वक्फ मालमत्तेवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे आदी बाबतची माहिती सादरीकरणातून यावेळी दिली.या बैठकीत सादरीकरणातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: महायुती सरकार महाराष्ट्र राज्य धाराशिव उस्मानाबाद इनामी जमीन osmanabad dharashiv
SendShareTweet
Previous Post

जिल्हा प्रशासन महिला बचत गटांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणार – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Next Post

ईद मिलादुन्नबी निमित्त धाराशिव येथे एसीएम ग्रुप व पाकीजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित शिबिरामध्ये  236 जणांनी केले रक्तदान..

Related Posts

महाराष्ट्र

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026
महाराष्ट्र

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026
महाराष्ट्र

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026
महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
Next Post

ईद मिलादुन्नबी निमित्त धाराशिव येथे एसीएम ग्रुप व पाकीजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित शिबिरामध्ये  236 जणांनी केले रक्तदान..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

March 5, 2026

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT