• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच : पालकमंत्री प्रताप सरनाईक

lokmadat news by lokmadat news
September 16, 2025
in कृषी
0
0
SHARES
6
VIEWS

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच : पालकमंत्री प्रताप सरनाईक



वडगाव (सिद्धेश्वर)येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी

धाराशिव, दिनांक १६ (प्रतिनिधी) : अतिवृष्टीने जिल्ह्यात  शेतकरी, पशुपालक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत.त्याप्रमाणे कार्यवाही सुरूच आहे. या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना, पशुपालकांना शासन मदत मिळेल. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांना दिली.

धाराशिव तालुक्यातील वडगाव (सिद्धेश्वर) येथे नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी भर पावसात  पालकमंत्री सरनाईक यांनी आज केली. यावेळी ते बोलत होते. वडगाव (सि.) येथील शेतकरी भुजंग जानराव यांनी लावलेल्या दोन एकर सोयाबीन पिकांची पाहणी पालकमंत्री सरनाईक यांनी केली व जानराव यांची व्यथा त्यांच्या बांधावर जात जाणून घेतली. यावेळी गजेंद्र जाधव यांनीही परिसरातील पिकांच्या नुकसानीची माहिती पालकमंत्री सरनाईक यांना दिली.

पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महादेव आसलकर, तलाठी माधव कदम, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यासंबंधी नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रस्ताव देखील शासनास सादर केला आहे. परंतु त्यानंतरही अतिवृष्टी, पावसाने शेतकरी, पशुपालक यांचे नुकसान झालेले आहे, त्याबाबतचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरूच आहे. ही कार्यवाही पूर्ण होताच शासनास प्रस्ताव सादर करण्यात येईल. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत मिळेल, असे पालकमंत्री सरनाईक यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद 

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv osmanabadआपत्तीग्रस्त शेतकरीकर्जमाफी अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
SendShareTweet
Previous Post

कोणताही निकष न लावता नुकसान ग्रहित धरुन मदत द्यावी ;खा. ओम. राजेनिंबाळकर यांची कृषिमंत्र्याकडे मागणी

Next Post

शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश… पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोहळा संपन्न

Related Posts

कृषी

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान तातडीने पंचनामे करा – डॉ.प्रतापसिंह पाटील

February 26, 2026
कृषी

तुळजाभवानी कृषि महोत्सवाचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

February 24, 2026
कृषी

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

February 12, 2026
कृषी

31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपयेप्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणार एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

January 11, 2026
कृषी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे 3 कोटी 90 लाख 22 हजार 789 रूपये  शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा

January 2, 2026
कृषी

हातलाई शुगरच्या  गूळ पावडरच्या पहिल्या आकरा पोत्याचे पूजन

November 19, 2025
Next Post

शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश... पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT