लोकमदत न्यूज | धाराशिव : मराठा समाजासाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या आमरण उपोषणाला मोठे यश मिळाले आहे. आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबांना आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी देण्यात यावी, या त्यांच्या मागणीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
उपोषण सोडविताना सरकारच्या उपसमितीने दिलेल्या आश्वासनानुसार आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पीडित कुटुंबीयांनी आवश्यक कार्यवाहीसाठी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणादरम्यान आत्महत्याग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात सोडवले जावेत, यासाठी जिकरीने पाठपुरावा केला. साधारणतः आंदोलने संपल्यानंतर पीडितांकडे दुर्लक्ष होत असते, मात्र या वेळी जरांगे पाटील यांनी सातत्याने दबाव आणून कुटुंबांना दिलासा मिळवून दिला आहे.
मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळालेल्या या मदतीमुळे समाजात दिलासा व आशेचा किरण निर्माण झाला आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












