शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे प्रथमच गुडघ्याची अत्यंत मोठी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी…
अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांच्या प्रयत्नातून गुडघा प्रत्यारोपण (Total Knee Replacement) शस्त्रक्रिया करून रुग्णास वेदनारहित हालचाली साठी प्रेरणा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे प्रथमच गुडघ्याची अत्यंत मोठी व अवघड अशी टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.
धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या आई सुनीता देवी वय ५८ वर्ष यांना दोन्ही गुडघ्यामध्ये त्रास होता व गुढघ्याची झीज होऊन त्यांना बदलावे लागेल असे तज्ञांनी सांगितले असल्याने पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात शैलेन्द्र चौहान यांच्याशी संपर्क करून शासकीय रुग्णालयात ही गुडघ्याची शस्त्रक्रिया होऊ शकते अशी खात्री केल्यानंतर अधिष्ठाता यांनी अस्थिरोग विभागप्रमुख डॉ बालाजी भराटे यांच्याशी चर्चा करून ही शस्त्रक्रिया आपल्या रुग्णालयात करू म्हणून त्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी सर्व तयारी करून आज दिनांक २ जानेवारी २०२६ मध्ये धाराशिव मध्ये प्रथमच टोटल नी रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया अधिष्ठाता यांच्या प्रयत्नातून यशस्वी रित्या पार पडली. यासाठी मिरज चे प्रसिध्द अस्थिरोग तथा सांधा प्रत्यारोपण तज्ञ डॉ भास्कर प्राणी व डॉ बालाजी भराटे यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ तानाजी लाकाळ,भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ पुष्पा अग्रवाल, डॉ. सोनटक्के, डॉ गणेश खंदारकर, डॉ दिप्ती नगराळे,डॉ सुयश इंगळे, डॉ ओंकार केरकर ,डॉ हर्षद पवार , डॉ गायकवाड, निंबाळकर सिस्टर,जाधव मामा आदी लोकांचे सहकार्य लाभले.
विशेष म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे अशी मोठी शस्त्रक्रिया व पोलीस अधीक्षक मॅडम यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर दाखवलेला विश्वास याचे सर्व श्रेय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मा. डॉ शैलेंद्र चौहान यांना जाते.
अशा मोठ्या ऑपरेशन साठी महाविद्यालय व रुग्णालय मधील सर्व कर्मचारी यांनी खूप मेहनत घेऊन आज धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाचे चांगल्या कामामुळे सर्वत्र चर्चा होत असून सर्व स्तरातून याचे कौतुक होत आहे.












