याहिया सुहेल अहमद काझी यांच्या हस्ते क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज मध्ये ध्वजारोहण संपन्न
धाराशिव – क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज धाराशिव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक निरीक्षक याहिया अहमद काझी यांच्या हस्ते ध्वजारोहण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले,
1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे , डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आहेत , संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत भारताचे संविधान हाच भारताचा सर्वोच्च कायदा आहे, हा दिवस भारतीय इतिहासातील सूवर्ण दिन आहे हा दिवस आपल्याला शांतता आणि एकता शिकवतो आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे असे मत केले व्यक्त केले,
यावेळी संस्था सचिव कुलदीप सावंत, प्राचार्य डॉ आर एस काझी ,यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बापू बारते,व आभार प्रदर्शन प्रा राहुल शिरसाठ व पवन नाईकल, अभी घुटे यांनी केले तसेच या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












