ठाणे, दि. २७ ऑगस्ट (प्रतिनिधी):राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक यांच्या घरी यंदाही गणेश स्थापना मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि आनंदात करण्यात आली. गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण घरात मंगलमय वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी सरनाईक कुटुंब एकत्र येऊन बाप्पाचे स्वागत करण्यात व्यस्त होते. विशेषतः नातवंडांच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे उत्सवाची रंगत अधिकच वाढल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
सरनाईक कुटुंबासाठी हा उत्सव केवळ परंपरा नसून बाप्पाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आहे. गणराय सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि मंगलकार्य घेऊन येवो, हीच प्रार्थना कुटुंबीयांनी केली.












