• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

मत मोजणीमुळे शासकीय आयटीआय मार्ग वाहतुकीसाठी बंद…रुग्णसेवा, निवडणूक वाहने व इतर अत्यावश्यक सेवेसाठी खुला

lokmadat news by lokmadat news
February 8, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
386
VIEWS

मत मोजणीमुळे शासकीय आयटीआय मार्ग वाहतुकीसाठी बंद रुग्णसेवा, निवडणूक वाहने व इतर अत्यावश्यक सेवेसाठी खुला

धाराशिव – लोकमदत न्यूज

धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मत मोजणी प्रक्रिया सोमवार दि.९ फेब्रुवारी रोजी धाराशिव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आरटीआय) मध्ये होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या आदेशानुसार या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपली वाहने पर्यायी मार्गानी घेऊन जावेत असे निर्देश दिले आहेत. मात्र, रुग्ण, निवडणुकीशी संबंधित व पोलीस वाहनांना यातून वळविण्यात आले आहे.

दिलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की,  ज्याअर्थी उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, धाराशिव यांनी दि८ फेब्रुवारीच्या अहवालात सादर केले आहे की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची मत मोजणी दिनांक ९ फेब्रुवारी रोजी धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मत मोजणी होणार आहे. मत मोजणी ठिकणी येणाऱ्या उमेदवारांच्या सोबत त्यांचे समर्थक, कार्यकर्ते, वाहने हे मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा वेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये. तसेच मत मोजणी निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मत मोजणी ठिकाणा समोरुन जवळून, मार्गे होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

त्यामुळे पोलीस अधीक्षक रितु खोखर यांना प्राप्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) अन्वये अधिकाराचा वापर करुन मत मोजणी निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षीततेच्या कारणावरुन दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते मत मोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील प्रमाणे वाहतूक मार्गात बदल करण्याचे निर्देशित दिले आहेत.

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मत मोजणी अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल. सर्व प्रकारच्या वाहनास वाहतुकीस मनाई बाबत धाराशिव ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मार्गे तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीस पथ क्रमण करण्यास जुना तुळजापूर नाका धाराशिव (मोरया हॉस्पीटल) ते शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक या दरम्यान मनाई करण्यात आली आहे.  तुळजापूर ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मार्गे धाराशिवकडे येणाऱ्या वाहतुकीस पथ क्रमण करण्यास शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते जुना तुळजापूर नाका धाराशिव (मोरया हॉस्पीटल) या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतील, धाराशिव ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)कडे जाणारी वाहतूक धाराशिव बस स्थानक ते भावानी चौक (सांजा चौक) ते तुळजापूरकडे पथ क्रमण करतील. किंवा तुळजापूर नाका टी पॉईंट ते गावसुद ते पोहनेर ते अपसिंगा मार्गे ते तुळजापूरकडे पथ क्रमण करतील. तर तुळजापूर ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मार्गे धाराशिवकडे येणारी वाहतूक शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते भावानी चौक (सांजा चौक) ते बस स्थानक मार्गे धाराशिवकडे पथ क्रमण करतील.  तसेच

वरील बंधने ही पोलीस, रूग्ण सेवा, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील व निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेल्या शासकीय वाहनांना लागू राहणार नाहीत. त्यामुळे  वरील बंधनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आदेश पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिले आहेत.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

मुगाव येथे माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क… लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग

Next Post

धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने अव्वल स्थान पटकावले

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने अव्वल स्थान पटकावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT