शहरातील स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन
धाराशिव,दि.१७ (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात १५१ उंचीच्या स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज पार पडले.
धाराशिव नगर परिषदकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे पालकमंत्री सरनाईक यांनी कौतुक केले.हा अतिशय चांगला उपक्रम असल्याचेही ते म्हणाले.यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे,मनोज जरांगे-पाटील आदींची उपस्थिती होती.सुरूवातीला पालकमंत्री सरनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












