• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

“तुळजापुरात गुटख्याचा खुलेआम सुळसुळाट कारवाईच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा – 31 जानेवारीला आंदोलन”

lokmadat news by lokmadat news
January 9, 2026
in क्राईम
0
0
SHARES
104
VIEWS

“तुळजापुरात गुटख्याचा खुलेआम सुळसुळाट कारवाईच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा – 31 जानेवारीला आंदोलन”

तुळजापूर प्रतिनिधी :-तुळजापूर शहर व तालुक्यात गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर विक्री व वाहतूक सुरू असून, यावर संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, धाराशिव यांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर हे धार्मिक व तीर्थक्षेत्र असल्याने येथे राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, अशा पवित्र नगरीत गुटख्यासारख्या घातक पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागासह शहरी परिसरातही गुटख्याचे मोठे गोडाऊन कार्यरत असून, त्यामधून राजरोसपणे विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असतानाही केवळ कागदोपत्रीच कारवाई होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. तुळजापूर तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणावर गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. गुटख्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामागे काही अधिकारी व कर्मचारी गुटखा माफियांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहेत का, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, येत्या १५ दिवसांच्या आत तुळजापूर तालुक्यातील सर्व गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा समितीच्या वतीने अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धाराशिव येथे दिनांक 31 जानेवारी २०२६ रोजी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच संबंधित पोलिस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
तुळजापूरसारख्या धार्मिक नगरीतील नागरिकांनी व सामाजिक संघटनांनीही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SendShareTweet
Previous Post

रस्ता सुरक्षा अभियानात ऊस वाहतूक वाहनांवर रिफ्लेक्टर, पादचाऱ्यांना ‘वॉक ऑन राईट’चे मार्गदर्शन

Next Post

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा गतीदायक पाठपुरावा
५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता

Related Posts

क्राईम

नियमभंग, गुन्हे आणि तक्रारींचा पाढा ‘महाकाली’ कला केंद्र ला सीलचा दणका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

February 26, 2026
क्राईम

धाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

February 25, 2026
क्राईम

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

February 15, 2026
क्राईम

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

February 12, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त …धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
Next Post

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा गतीदायक पाठपुरावा
५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT