धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त
धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात
धाराशिव लोकमदत न्यूज
धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्री व इतर तत्सम पदार्थ विक्रीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. अशा प्रकारच्या व्यसनाधीनतेच्या आहारी तरुण पिढी जाळ्यात अडकत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अशा प्रकारच्या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गल्लोगल्ली गुटखा मुक्त शेअर करण्यासाठी दि.३ फेब्रुवारी टाकलेल्या धाडीत ३२ हजार रुपयांचे बादशाहा, विमल, डायरेक्टर, गोवा व गुटखा आदी साहित्य जप्त केले आहे.
धाराशिव शहराच्या विविध भागांमध्ये चोरट्या मार्गाने महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या बादशाहा, विमल, डायरेक्टर, गोवा व गुटखा आदी साहित्य गल्ली-बोळातील पान टपरी व इतर ठिकाणी विक्री केले जाते. अशाच प्रकारचे साहित्य रसुलपुरा या भागात अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून ३२ हजार ९१० रुपयांचा बादशाहा, विमल, डायरेक्टर व गोवा जप्त करून आरोपी फिरोज शेख या आरोपी विरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कामगिरी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय दिघोळे, पोलीस नाईक रमाकांत जगताप, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर माळी, अतुल पाटील व दिपाली उंदरे यांनी केली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












