बीड जिल्हा खादीम-उल-हुज्जाज कमिटीच्या अध्यक्षपदी हाजी बी. एस. मोहसीन यांची निवड
सचिवपदी हाजी एजाज बेग, सहसचिवपदी हाजी सय्यद सलाहुद्दीन शमशोद्दीन यांची निवड
बीड (प्रतिनिधी) – जिल्हाभरातून मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणावर हजयात्रासाठी जातात. हाजी यांच्या सेवेसाठी, हज जाण्याच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी बीड जिल्हा खादीम-उल-हुज्जाज कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीच्या संस्थापक अध्यक्षपदी हाजी बी. एस. मोहसीन यांची नियुक्तीकरण्यात आली आहे.
बीड येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते बीड जिल्हा खादी-उल-हुज्जाज कमिटीची स्थापना करण्यात आली. यावेळी कमिटीच्या संस्थापक अध्यक्षपदी हाजी बी. एस. मोहसीन यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी हाजी एजाज बेग सर, उपाध्यक्षपदी प्रा. ताज मुलानी, हाजी मोमीन मुशर्रफ मोमीन मुख्तार तर सहसचिवपदी हाजी सय्यद सलाहुद्दीन शमशोद्दीन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मागील तीन वर्षा पासून हज यात्रेसाठी जाणाऱ्या हाजींच्या सेवेसाठी ही कमिटी काम करत आहे.
दर वर्षी ही कमिटी हज यात्रेसाठी जाणाऱ्या हाजी साठी दोन महिन्याची मार्गदर्शन शिबिर आयोजित करतात. मार्गदर्शन शिबिर मध्ये हज यात्रा मध्ये जे जे आमाल ( कार्य ) करावा लागतो ते सर्व आमाल सविस्तर मुफ्ती साहेब हाजियाना मार्गदर्शन करतात. हजियांसाठी बीड ते मुंबई एअरपोर्ट, मुंबई एअरपोर्ट ते बीड येण्या जाण्यासाठी नियोजन करतात. असे संस्थापक अध्यक्ष हाजी बी.एस. मोहसीन यांनी सांगितले आहे.












