• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

उच्चशिक्षित नगरसेविका पठाण यांची सभागृहात प्रभावी मांडणी शाळांसाठी वर्गखोल्या आणि ईदगाह मैदानाला कमान उभारणीची मागणी

lokmadat news by lokmadat news
March 17, 2026
in राजकारण
0
0
SHARES
415
VIEWS

उच्चशिक्षित नगरसेविका पठाण यांची सभागृहात प्रभावी मांडणी शाळांसाठी वर्गखोल्या आणि ईदगाह मैदानाला कमान उभारणीची मागणी

प्रभाग १८ मधील नगरसेविकेचा अभ्यासपूर्ण पुढाकार  २७१ विद्यार्थ्यांसह मुस्लिम समाजाच्या सुविधांसाठी सभागृहात आवाज उठवला

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव नगरपरिषद सर्वसाधारण सभेत काँग्रेस पक्षाच्या महिला नगरसेविका व उच्चशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. पठाण उजमा सबा अजहरखान यांनी विविध लोकहिताच्या विषयांवर अभ्यासपूर्ण व आक्रमक मांडणी करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग १८ मधील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून सर्व स्तरांतून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
नगरसेविका पठाण यांनी नगराध्यक्षांकडे सादर केलेल्या निवेदनात शहरातील शिक्षण व पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न अधोरेखित केले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून सुविधा उपलब्ध होत असल्या तरी काही ठिकाणी अद्याप मूलभूत सोयींचा अभाव असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
विशेषतः नगरपरिषद शाळा क्र. ८ व १४ येथे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सध्याच्या वर्गखोल्या अपुऱ्या पडत आहेत. सुमारे २७१ विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर उपाय म्हणून नवीन वर्गखोल्या बांधण्याचा प्रस्ताव त्यांनी सभागृहात मांडला.
सन २०२५-२६ च्या नियोजनामध्ये या शाळांसाठी अतिरिक्त वर्गखोल्यांना मंजुरी देऊन लवकरात लवकर बांधकाम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये मांडली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी हा विषय प्राधान्याने मार्गी लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात ठणकावून सांगितले.
याचबरोबर शहरातील मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ईदगाह मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कमान उभारण्याची मागणीही त्यांनी केली. शहरात ईद दिवशी नमाज अदा करण्यासाठी हे सर्वात मोठे आणि एकमेव प्रमुख ठिकाण असल्याने या ठिकाणी सुशोभीकरण व सोयीसुविधा वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते, मात्र प्रथमच कमी वयात आणि प्रथमच निवडणुकीमध्ये उभे राहून निवडून आलेल्या उच्चशिक्षित महिला नगरसेविका असूनही पठाण यांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडल्याने समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
विरोधी बाकांवर प्रतिनिधित्व असतानाही त्यांनी लोकहिताच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी अखेर जागा मिळाली ४० वर्षांची प्रतीक्षा संपली!…

Next Post

लोकमदत न्यूजच्या वृत्तांची दाखल थेट विधानसभेत आ. सुरेश धस यांची लक्षवेधी – बांधकाम कामगार घोटाळ्यावर कामगार मंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

Related Posts

राजकारण

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026
राजकारण

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026
राजकारण

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आडवलेला रस्ता उखडून टाकण्याचा इशारा 

March 27, 2026
राजकारण

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

March 26, 2026
राजकारण

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार – जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

March 26, 2026
राजकारण

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

March 20, 2026
Next Post

लोकमदत न्यूजच्या वृत्तांची दाखल थेट विधानसभेत आ. सुरेश धस यांची लक्षवेधी - बांधकाम कामगार घोटाळ्यावर कामगार मंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवचा आर्थिक कायापालट होणार! १०८ नवे उद्योजक घडवण्याचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा संकल्प,

April 1, 2026

मुख्यमंत्री रोजगार’मध्ये सलग चौथ्या वर्षी धाराशिव राज्यात अव्वल जिल्ह्याची ऐतिहासिक गगनभरारी आमदार राणाजगजितसिंह पाटील

चार वर्षात ३१०० प्रकल्पांना मंजुरी : आमदार राणाजगजितसिंह पाटील

March 31, 2026

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT