लोहारा तालुक्यातील शेकडो युवकांचा आनंद (तात्या) पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश
लोहारा दि.१२ (प्रतिनिधी):लोहारा तालुक्यातील शेकडो युवकांनी जल्लोषात शिवसेना पक्षात प्रवेश करून नवा उत्साह निर्माण केला. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या विकासाभिमुख कामकाजाने आकर्षित होऊन युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन धाराशिव (युवासेना) लोकसभा अध्यक्ष आनंद (तात्या) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आनंद पाटील यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या गळ्यामध्ये पक्षाचे चिन्ह असलेले भगवा ध्वज खांद्यावर घालून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा, एकनाथ शिंदे आमचा नेता!’ अशा घोषणांनी वातावरण भारून टाकले.
आनंद पाटील यांनी सांगितले की, “शिवसेना हा तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा विचार आजही आमच्या कामाचा मूलमंत्र आहे. युवकांनी शिवसेनेत दाखल होऊन समाजकारणाची नवी दिशा निर्माण करावी.”
धाराशिव जिल्ह्यातील युवकांच्या नेतृत्वक्षमतेला आकार देण्यात आनंद (तात्या) पाटील यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी जिल्ह्यात सातत्याने युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होत आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या युवानेते प्रशांत थोरात आणि अप्पा मुळे यांनी नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या सोहळ्यात वैभव होंडराव, रोहित भोई, प्रतीक गाढवे, शिवदास मोरे, राजेश चपळे, गणेश नरगाळे, यश मोरे, अनिरुद्ध क्षीरसागर, मंगेश कदम, हरिओम गिरी, समर्थ कुंभार, वैभव पाटील, केदार निर्मळे, संदीप कांबळे, सागर पाटील, सवी कांबळे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. ढोल-ताशांच्या गजरात प्रचंड अतिशाबाजी करीत भगव्या झेंड्याखाली “जय शिवसेना, जय महाराष्ट्र”च्या घोषणा देत सर्व कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठेची शपथ घेतली.












