हे संकट माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर होते असे समजुन मी परीस्थितीला सामोरे गेलो – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
लोकसभेच्या प्रचारादरम्यान मतदान मागताना मी तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आहे असे म्हणालो होतो. त्यामुळे पुर परिस्थिती ज्यांना मदत केली ते माझ्या कुटुंबातील सदस्य होते. हे संकट माझ्या कुटुंबावर आहे असे समजुन मी त्या परीस्थितीला सामोरे गेलो असे मत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी वडनेर ता. परांडा येथील चौधरी कुटुंबाला पुर परिस्थितीतून बाहेर काढल्यानंतर अशी भावनिक प्रतीक्रिया दिली.
धाराशिव जिल्हयातील भुम व परांडा तालुक्यात मागील 24 तासात 118 मिली मिटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून दोन्ही तालुक्यातील सर्व नद्या दुथडी भरुन वाहत आहे. परांडा तालुक्यातील सर्व तलाव ओव्हर फ्लो झाल्याने तालुक्यात मोठया प्रमाणात नद्यांना पुर आला आहे. नद्याला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठच्या गावांना वेढा टाकला असून अनेक गावातील घरात पाणी शिरल्याने पुर परिस्थीती गंभीर बनली आहे. याची माहिती खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मिळाली असता त्यांनी वडनेर ता. परांडा येथील पुरात एकाच कुटुंबातील भामाबाई नारायण चौधरी (वय 75) चंद्रकांत नारायण चौधरी (वय 62), आकांक्षा श्रीकृष्ण चौधरी (वय 23), शंभु श्रीकृष्ण चौधरी (वय 2) यांना एन.डी.आर.एफ. जवानांच्या मदतीने सुखरुपने काल सायं. 08.00 वा. बाहेर काढत असताना स्वत: पुरात एन.डी.आर.एफ.ची बोट बंद पडल्याने नागरीकांच्या मदतीने या सर्वांना सुरक्षीत बाहेर सुखरुप बाहेर काढले आहे.
परांडा तालुक्यातील लाखी येथील पिंगळे कुटुंबातील मुलीने माझ्याशी पहाटे 03.00 वा. संपर्क करुन पुर परिस्थीती संदर्भात माहिती दिली. नंतर पहाटे 04.00 वा. किर्तीकुमार पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याशी चर्चा करुन नाशिक सैन्य दलाचे हेलीकॉप्टर तुकडीचे कर्नल अक्षयकुमार सिंग यांच्याशी पुर परिस्थीती संदर्भात चर्चा करुन हेलीकॉप्टरने नागरीकांना काढणेबाबत विनंती केली. त्यानंतर हॅलेकॉप्टरचे कमांडीग ऑफीसर लेप्टनन कर्नल श्री. करण बरार मेजर देवांश यांनी लाखी येथील पिंगळे कुटुंबियासह 13 महिला 2 लहान मुले व 12 पुरुशांना सुखरुप बाहेर काढले असून त्यांना सुरक्षीत स्थळी पोहचवले आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












