धाराशिव बस स्थानकात लोकमदत न्यूजच्या बातम्यांचा तात्काळ परिणाम!
पालकमंत्री सरनाईक यांच्या आदेशानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
महिला विश्रांती कक्ष व हिरकणी कक्ष सुरू• पिण्याचे पाणी सुविधा स्वच्छ ठिकाणी हलवली तर कन्या सुरक्षा साठी महिला सुरक्षा रक्षक तैनात
धाराशिव दि. २८ (प्रतिनिधी) – धाराशिव बस स्थानकातील पिण्याचे पाणी, शौचालयातील अस्वच्छता, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक कक्षांचा अभाव, तसेच अकाऊंट विभागाच्या धोकादायक इमारतीतील स्थितीबाबत लोकमदत न्यूजने आज सकाळी केलेल्या बातमीचा तात्काळ परिणामस्वरूप स्थानिक एसटी प्रशासनाने मोठे निर्णय अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आज होणाऱ्या पाहणीदौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्शन मोडवर असून अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागताना एक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
बस स्थानकातील पिण्याचे पाणी ही सर्वात मूलभूत गरज असून, हे पाणी शौचालयाला लागूनच ठेवलेल्या तात्पुरत्या फिल्टरमधून दिले जात असल्याचे लोकमदत न्यूजने उघड केले होते. दुर्गंधीयुक्त, अस्वच्छ वातावरणात ठेवलेले फिल्टर पाहून प्रवाशांनी आरोग्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने धावपळ करत पाण्याचे फिल्टर स्वच्छ जागी हलवले असून पाणीपुरवठा सुधारल्याचे दिसून आले.
महिला कर्मचाऱ्यांसाठी बांधलेला महिला विश्रांती कक्ष तब्बल सहा महिन्यांपासून बंद होता. या बाबतही बातमी प्रसिद्ध होताच विभागाने तातडीने हा कक्ष सुरू केला. बाहेरगावहून ड्युटी करून येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना विश्रांतीचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. अखेर हा कक्ष सुरू झाल्याने महिला कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण दिसत आहे.
याशिवाय पालकमंत्री सरनाईक यांच्या सूचनेनुसार बस स्थानक परिसरात हिरकणी महोत्सव, विद्यार्थिनींसाठी ‘कन्या सुरक्षा’, स्वतंत्र आसन व्यवस्था तसेच महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षा रक्षक सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थिनी व महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आलेल्या या उपाययोजनांचे प्रवासी वर्गातून स्वागत केले जात आहे. तसेच शालेय विद्यार्थिनीसाठी एसटी हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२५१ हा नंबर देखील जाहीर करून त्याचे दर्शनी भागात फलक लावण्यात आले आहेत.
बसस्थानकाच्या जुन्या, जीर्ण इमारतीत असलेला अकाऊंट विभाग हा दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालला होता. सापांसह इतर प्राण्यांचा वावर, असुरक्षित वातावरण, रात्री फेरफटका मारणाऱ्या मद्यधुंद व्यक्ती आणि सुरक्षा रक्षकांचा अभाव यामुळे महिला कर्मचाऱ्यांवर मोठा धोका निर्माण झाला होता. मागील दोन महिन्यांपूर्वी हा विभाग नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र ते अडकून पडले होते. बातमी प्रसिद्ध होतानाच या प्रक्रियेस वेग आला असून अकाऊंट विभाग १५ दिवसांत मुख्य इमारतीत स्थलांतरित होणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अजय पाटील दिली यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष कोष्टी, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीधर नेहरकर, यंत्र अभियंता मिथुन राठोड,विभागीय अभियंता राहुल पवार,आगारप्रमुख बालाजी भांगे, आदी उपस्थित होते.
धाराशिव आगार मधील डेपोची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत कधीच काम झाले नसल्याने चिखलाचा प्रश्न अजूनही तसाच आहे. तर वर्कशॉप मधील काँक्रीटीकरण करून देण्याची घोषणा करावी अशी मागणी कर्मचारी वर्गातून अशी होत आहे, पालकमंत्री सरनाईक यांनी आज देत असलेल्या भेटीतच तातडीने घोषणा करून काँक्रीटीकरणाचे काम त्वरित सुरू करावे. बसांच्या हालचाली, ड्रायव्हर्स-कंडक्टर यांची ये-जा आणि वाहन देखभालीला सतत चिखलामुळे अडचणी निर्माण होत आहेत.
लोकमदत न्यूजने मांडलेल्या मुद्द्यांची परिवहन विभागाने तात्काळ दखल घेतली. पाणी, महिला विश्रांती कक्ष, सुरक्षा, विद्यार्थी सुविधा आणि अकाऊंट विभागाच्या स्थलांतराच्या प्रक्रिया जलद गतीने सुरू झाल्याने प्रवासी व कर्मचारी वर्गातून लोकमदत न्यूजचे आभार मानले जात आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


















