तामलवाडी पोलिसावर तत्काळ निलंबनाची कारवाई
धाराशिव ‘झिरो उर्फ तोतया व्यवहार’ प्रकरणी कोणाचा आशीर्वाद ?
जिल्हा दौऱ्यावर असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिसा अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही कानमंत्र देणार का ?
धाराशिव, दि. २६ (अमजद सय्यद): जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशानुसार तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अल्ताफ मकबुल गोलंदाज (बकल नं. 1413) यांना दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी कर्तव्यावर असताना जाणूनबुजून केलेल्या कसुरीचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तत्काळ निलंबित करण्यात आले. पोलीस दलात जबाबदारी व शिस्तीला प्राधान्य देत निष्काळजीपणास सहनशीलता नाही, असे एसपी खोखर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. मात्र, निलंबनाच्या या जलद कारवाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील “झिरो /तोतया पोलिसांच्या मदतीने झालेल्या केळीच्या गाड्यावरील कथित पिशवी व्यवहार” प्रकरणावर कारवाई होणार का ? असा प्रश्न शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे. आठवडी बाजाराजवळ अवैध दारू वाहतूक प्रकरणात कथित कॅरीबॅगखाली ठेवून झालेल्या पैशांच्या देवाणघेवाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्या संदर्भात रिक्षाचालक थेट एसपीकडे तक्रार दाखल करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.
या झिरो /तोतया आणि काही “घुग”ऱ्या खाऊन “बेळ”गाम झालेल्या पोलिसांना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच पाठबळ असल्याच्या चर्चा आता शहरभर सुरू झाल्या आहेत. त्यातच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी अशाच स्वरूपाच्या तक्रारी अर्ज दाखल असूनही कारवाई गुलदस्त्यात आहे, तर अवैध वाहतूक, तोडपाणी, रस्त्यावर वाहन अडवून पैसे गोळा करणे यांसारख्या आरोपांनी शहरातील नागरिक आणि प्रामाणिक पोलिसांमध्ये संताप उसळला आहे. तामलवाडी प्रकरणात तातडीची कारवाई झाली, तर धाराशिव शहरातले काहीजण मात्र “सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडींसारखे संरक्षित ?” असा प्रश्न निर्माण झाला असून यामुळे विविध प्रकारच्या चर्चा चवीने रंगू लागले आहेत.
आता सर्वांचे लक्ष एकाच दिशेकडे तामलवाडीसारखी कडक कारवाई धाराशिव झिरो /तोतया व्यवहार प्रकरणातही होणार की पुन्हा फक्त (गोलामल) कागदी घोडे नाचून ‘संरक्षण’च दिले जाणार ?
जनता व पोलीस दलातील प्रामाणिक कर्मचारी उत्तराची वाट पाहत आहेत !
खरंच सदरील प्रकरण संपूर्ण पारदर्शक करून पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ नये असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी संबंधित “त्या” झिरो/ तोतया पोलिसाचे छायाचित्र प्रसिद्धी करून या महाशयाने आतापर्यंत कितीजणांना पोलीस असल्याचे भासवून फसवणूक केली आहे ? त्यांनी रीतसर तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे करावी, त्यांची नावे चौकशी होईपर्यंत गोपनीय ठेवले जातील, असे आश्वासन वजा आवाहन करताच असंख्य फसवणूक झालेले सर्वसामान्य नागरिक यांच्यासह छोटे-मोठे व्यापारी व वाहन चालक पुढे येऊन तक्रार करतील. त्यानंतर या तोतया अर्थात झिरो उर्फ हिरो बनलेल्या त्रिकुटाचे अनेक कारणाने समोर येण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील फसवा फसवीचे मोठे रॅकेट उघड होणार ?
‘त्या’ झिरो पोलिसाची ओळख परेड होणार का ?
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मी पोलीस आहे, पुढे अपघात झाला आहे किंवा लुटमार करणारी टोळी आली आहे. तुमच्या जवळचे दागिने व पैसे काढून आमच्याजवळ द्या, आम्ही सुरक्षित ठेवतो अशी बतावणी करणारे तोतया पोलीसांचे रॅकेट कार्यरत आहे. त्यांचे हे रॅकेट मोठे असून त्यांना पोलिसांचा वरदहस्त आहे का?. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या ज्या नागरिकांना मी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून सोने, चांदी आदींचे दागदागिने व पैसा आपल्याजवळ ठेवून घेऊन त्यांनी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची लूटमार केली आहे. मात्र, आजपर्यंत संबंधित तोतया पोलिसांना पकडण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा पोलीस प्रशासनाला देखील यश आलेले नाही. त्यामुळे त्या टोळीच्या मागे कोणत्या पोलिसांचे आशीर्वाद आहेत ? ती टोळी आजपर्यंत का जेरबंद केली गेली नाही ? चोरी गेलेला माल कुणाच्या घशात घातला ? याची चौकशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी का केली नाही ? त्यामुळे ज्यांची अशा पद्धतीने फसवणूक करून लुबाडणूक केली आहे, अशा सर्व संबंधित पीडित नागरिकांना बोलावून त्यांच्यासमोर या झिरो/ तोतया पोलिसाची ‘ओळख परेड’ करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण ज्यांची फसवणूक झाली ते नागरिक त्या झिरो/ तोतया पोलिसास काही क्षणात ओळखून दूध का दूध पानी का पानी केल्याशिवाय राहणार नाही, यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक खोखर यांना खरोखरच अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचा छडा लावून त्यास गजाआड करायचे असेल तर त्यांनी ही पावले तातडीने उचलणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. त्या याबाबत खोखर ओळख परेड करणार की झिरो पोलिसाच्या चोरीला साथ देणार ? यापैकी त्या कोणती भूमिका घेणार ? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












