• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव शहराच्या मंजूर 140 कोटी रुपयांच्या 59 रस्त्यांची कामे तत्काळ सुरु करा आ कैलास पाटील

lokmadat news by lokmadat news
August 21, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
55
VIEWS

धाराशिव ता. 21: नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांतुन होणाऱ्या 59 डीपी रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्राप्त झाली. नियमानुसार सात दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते तरीही आता 18 महिने उलटूनही यामध्ये काहीच होत नाही. यासाठी आमदार कैलास पाटील यांनी नगरविकासचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज यांची भेट घेऊन ही कामे लवकर सुरु करावीत अशी मागणी केली.
शहरातील रस्त्याच्या कामाना निधी मंजूर झाला, त्याला प्रशासकीय मंजुरी फेब्रुवारी 2024 ला मिळाली पण अजूनही त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सात दिवसात ही प्रक्रिया होऊन तीन महिन्यात ही कामे सुरु करणे असा नियम असताना अजूनही झालेली निविदा प्रक्रिया रद्द केल्यानं परिस्थिती दिड वर्षांपूर्वी जशी होती तशीच आहे. सहा जानेवारी 2025 रोजी नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्याची कामे करावी यासाठी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनावेळी  तात्कालीन मुख्याधिकारी यांनी दिनांक पत्राद्वारे निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, कामे 28 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत प्रत्यक्ष सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. आंदोलनामुळे 7 महिन्यापासुन रखडलेली निविदा उघडण्यात आल्या.  परंतु निविदा प्रक्रिया कंत्राटदारांच्या हव्यासापोटी 15 ते 16 टक्के  जास्तीने मंजुर केल्या. नगरोत्थान योजनेतील कामे असल्याने 25 टक्के हिस्सा नगर पालिकेला भरावा लागतो. 15 ते 16 टक्के आगाऊची निविदा मंजुर केल्या तर विनाकारण नगर परिषदेवर जवळपास 35 ते 40 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार होता.  महाविकास आघाडीच्यावतीने 28 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आले. तिसऱ्या दिवशी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 30 एप्रिल रोजी उपोषण स्थळी भेट देऊन निविदाधारकास बोलावुन वाटाघाटी करुन निविदाधारक अंदाजपत्रक दराने काम करण्यास तयार असेल तर त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात यावा अन्यथा फेर निविदा करण्यात यावी असे आश्वासन दिले. त्यानुसार दोन मे 2025 रोजी नगर परिषद प्रशासनाची मुंबई येथे बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर कंत्राटदाराने अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास तयार असल्याचे लेखी दिले. प्रकल्पाच्या निविदा मसुदयास राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची मान्यता घेण्यात आली नव्हती.अनुषंगीक बाबींची पुर्तता करुन प्रकल्पाची योग्य मार्गाने फेर निविदा राबवण्याची समितीने शिफारस केली आहे. परंतु या निविदा प्रक्रियेमध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत चालू विधानसभेच्या मागील तीनही अधिवेशनात व त्या अगोदरच्याही अधिवेशनात हा विषय मांडूनही त्यावर काहीच होत नाही ही बाब आता आमदार पाटील यांनी सचिवांच्या निदर्शनास आणून दिली.
धाराशिव शहरातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली असुन नागरीकांना चिखलातुन, खड्डयातुन मार्ग काढत जावे लागत असल्याने अपघाताचेही प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे धाराशिव नगरपालिकेस मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांच्या (59 डीपी रस्ते) रस्त्यांची निविदा प्रक्रिया तात्काळ पुर्ण करुन कामे तात्काळ सुरु करण्या बाबत आपल्या स्तरावरुन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी सचिव गोविंदराज यांच्याकडे केली आहे.

Tags: cmocrimedharashivosmanabad cityउस्मानाबादजिल्हाधिकारी कार्यालयधाराशिवनगर परिषदनगरविकासमंत्रालयमुख्याधिकारीविकासकामेसचिव
SendShareTweet
Previous Post

पती-पत्नीची धारदार शस्त्रांनी क्रूरपणे हत्या करणाऱ्यासह सहभागी आरोपींना फाशी द्या ..

Next Post

धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यांच्या मलमपट्टीचा पंचनामा  दिला आंदोलनाचा इशारा

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यांच्या मलमपट्टीचा पंचनामा  दिला आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT