पोलीस भरती संबंधाने पोलीस अधीक्षकांचे उमेदवारांना महत्वाचे आहवान
धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया दि. 11.02.2026 पासुन सुरु झाली आहे. सदर पोलीस भरती करीता जिल्ह्यातुन किंवा जिल्ह्याबाहेरुन मोठ्या प्रमाणावर उमेदवार आदल्यादिवशी अथवा रात्रीच्या वेळी धाराशिव येथे येत असुन त्यांची राहण्यासाठी व्यवस्था नसल्याने व गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलीस भरती करीता आलेल्या उमेदवारांपैकी ज्यांची राहण्याची व्यवस्था नसेल त्यांची राहण्याची व्यवस्था लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, पोलीस ग्राउंडचे दक्षिण बाजूस समर्थनगर धाराशिव येथे करण्यात आली आहे. तरी पोलीस भरती प्रक्रियातील मैदानी चाचणी करीता धाराशिव येथे आलेल्या उमेदवारांनी त्यांची रात्रीच्या वेळी राहण्याची सोय करण्याची आवश्यकता असल्यास पोलीस नियत्रंण कक्ष धाराशिव मोबाईल नंबर-7588527620अथवा- अमोल मोरे, सहा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव मोबाईल नंबर-9923693823, पोलीस अंमलदार-विनायक दहीहंडे मोबाईल नंबर-8999047874 यावर संपर्क करावा. तसेच पोलीस भरती प्रक्रिया धाराशिव पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर सकाळी 05.00 वा. चालु असुन उमेदवारांनी मैदानावर प्रवेश करण्यासाठी कवायत मैदान उत्तरेकडील बाजूने प्रवेश गेट मधून प्रवेश करावा. संपुर्ण मैदानी चाचणी संपल्यानंतर जुने पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथील प्रवेश द्वारा मधून बाहेर पडावे.
पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीमती. रितु खोखर यांनी केले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












