धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 14 मध्ये अपक्ष लाट – इकबाल उस्मान कुरेशींना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा
धाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार म्हणून इकबाल उस्मान कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रभागातील सर्व समाजांमध्ये दांडगा जनसंपर्क असलेले आणि नागरिकांशी घट्ट जोडलेले नेतृत्व म्हणून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद विरोधकांना चिंतेत टाकणारा ठरत आहे.
कुरेशी यांचे वडील उस्मान(हाजीसाब) कुरेशी हे संपूर्ण धाराशिव शहरात सामाजिक कार्य, दानशूर वृत्ती आणि कृषी समाजातील नेतृत्वामुळे परिचित नाव आहे. त्यांचा प्रभाव आणि परंपरागत ओळख याचा स्पष्ट फायदा इकबाल कुरेशी यांच्या उमेदवारीला मिळत असल्याचे चित्र प्रभागात दिसत आहे. शहरातील सर्व समाजांमध्ये मजबूत पकड, परिवाराची प्रतिष्ठा आणि वैयक्तिक समाजसेवा या पाठबळावर त्यांना नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने समर्थन मिळत आहे.
राजकीय पक्षांकडून उमेदवारी न घेता नागरिकांच्या आग्रहास्तव रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवाराला मिळणारे वाढते समर्थन पाहून प्रभागातील प्रतिस्पर्ध्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रचाराची औपचारिक सुरुवात होण्यापूर्वीच घराघरातील भेटी आणि नागरिक प्रश्नांवर थेट संवाद यामुळे त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट आहे.
सध्याच्या घडीला प्रभाग क्रमांक 14 मध्ये हवा अपक्षांच्या बाजूने वाहताना दिसत असून, विविध समाज, व्यावसायिक, तरुण व ज्येष्ठ नागरिकांच्या पाठिंब्यामुळे इकबाल उस्मान कुरेशी यांच्या विजयाची शक्यता अधिक मजबूत होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













