इरफान हाजी उस्मान कुरेशींच्या शब्दनिष्ठेचा राजकीय कसोटीक्षण – स्वीकृत नगरसेवकपदावर नाव जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी नेतृत्वावर वाढता जनदबाव
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी):धाराशिव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घवघवीत यश संपादन करत ८ नगरसेवक बहुमताने निवडून आणले. या निकालामुळे पक्षाला एक स्वीकृत नगरसेवक सभागृहात पाठवण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या पदासाठी शहरात सध्या तीव्र राजकीय चर्चा सुरू आहे.
या पदासाठी अनेक इच्छुकांनी आपापल्या राजकीय फळी उभारल्या असतानाच सामाजिक क्षेत्रात गेली २५–३० वर्षे निस्वार्थ सेवाभावाने कार्यरत असलेले इरफान हाजी उस्मान कुरेशी यांचे नाव पक्षाच्या बैठकीमध्ये सर्वाधिक आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे, नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या इरफान कुरेशी यांनी पक्षहितासाठी आपली उमेदवारी माघार घेतली होती.
पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार भीमनगर येथील एका ज्येष्ठ नेत्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या शब्दामुळे त्यांनी मोठे मन दाखवत हा निर्णय घेतला, ज्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही अधिकृत उमेदवार त्या प्रभागात भरघोस मताधिक्याने विजयी झाले.
याच बैठकीत इरफान कुरेशी यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर आता पक्षातील एका मोठ्या गटाने पक्षश्रेष्ठींवर इरफान कुरेशी यांचे नाव तात्काळ जाहीर करण्यासाठी दबाव वाढवला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीतही या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली असून, बहुसंख्य नेत्यांनी “शब्दाला जागा” या तत्वावर आपली भूमिका स्पष्ट केल्याची देखील माहिती मिळाली आहे.
इरफान कुरेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास पक्षश्रेष्ठींचा शब्दनिष्ठ आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता म्हणून विश्वास अधिक दृढ होईल, अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील नेत्यांनी बोलून दाखवली असल्याचे म्हटले आहे.
शहरातील नागरिक, कार्यकर्ते व सामाजिक संस्थाही आज खुलेपणाने इरफान कुरेशी यांच्या पाठीशी उभे राहत असून,
“सेवेला सन्मान मिळायलाच हवा” अशी जनभावना आकार घेत आहे.
आता सर्वांचे लक्ष पक्षश्रेष्ठींच्या अंतिम निर्णयाकडे लागले असून,
इरफान कुरेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केव्हा होणार?
याची अधिकृत घोषणा लवकरच होईल, अशी माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मात्र पक्षश्रेष्ठी कुरेशीना न्याय देणार की ऐन वेळेस नवीन कार्यकर्त्यांना संधी देणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786













