जमियतुल-उलमा- हिंदची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर; जिल्हाप्रमुखपदी मौलाना अयुब सय्यद
मराठवाडा सचिवपदी मसूद शेख यांची फेरनिवड
धाराशिव –
जमियतुल-उलमा- हिंद या संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर होवून जिल्हाप्रमुखपदी मौलाना सय्यद अयुब खासिम यांची निवड करण्यात आली. तर मराठवाडा सचिवपदी मसूद शेख यांची फेरनिवड करण्यात आली. उदगीर येथे जमियतुल-उलमा- हिंदचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर येथे झालेल्या संमेलनात ही निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणीमध्ये काटगुजार अध्यक्षपदी मौलाना इम्रान पठाण, नायब अध्यक्षपदी मौलाना उस्मान खान, पैगंबर काझी, जनरल सेक्रेटरी आरेफ अहमद, सेक्रेटरी इलियास पीरजादे, मुफ्ती फिरदौस फेरोजखान तर सदस्यपदी जहिरोद्दीन काझी, आयाज शेख, उमरखाँ शेख, नईम पटेल, मौलाना शौकतअली सय्यद, अखिब पटेल, शब्बीर गवंडी, खलील पठाण, हाफीज युसुफ गुलाम मोहियोद्दीन, जावेद बागवान, अन्वर शेख, जावेद बागवान, हाफीज फेरोज काझी, नुरोद्दीन शेख यांची निवड करण्यात आली आहे.
याच संमेलनात जमियतुल-उलमा- हिंदची मराठवाडा कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. यामध्ये मराठवाडाप्रमुखपदी खारी शम्सुलहक खासमी, नायब प्रमुखपदी मौलाना अब्दुल जलील सय्यद, मुजतबा खान, जनरल सेक्रेटरीपदी मुफ्ती अब्दुर रहमान अशरफी, सेक्रेटरी म्हणून मौलाना मोईजोद्दीन फारूकी, मुफ्ती अब्दुर रज्जाक मिल्ली, मसूद शेख, मुफ्ती रहमतुल्ला, अब्दुर रौफ इंजिनिअर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल नूतन पदाधिकार्यांचा जमियतुल-उलेमा-हिंदच्या वतीने सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786













