व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकार दिन साजरा
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) – आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन दि.६ जानेवारी रोजी करण्यात आले.
धाराशिव शहरातील दैनिक धाराशिव नामा वृत्तपत्र कार्यालयात आयोजित करण्यात आले जांभेकर यांच्या कार्यावर जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा सरचिटणीस आकाश नरोटे, धाराशिव तालुकाध्यक्ष कुंदन शिंदे, कार्याध्यक्ष अल्ताफ शेख, सरचिटणीस सचिन वाघमारे, सलीम पठाण, कलीम मुसा सय्यद, अमजद सय्यद, अजर शेख, जफर शेख, किरण कांबळे, प्रशांत सोनटक्के, प्रशांत मते, विशाल जगदाळे, सुरेश चव्हाण, विनोद कोकाटे, बळीराम खटके आदी उपस्थित होते.












